cyber crime.jpg 
नाशिक

दिवाळी पार्श्वभूमीवर ऑनलाइनच्या आमिषाला बळी पडू नका!

अंबादास शिंदे

नाशिक रोड : व्यापारी, दुकानदार, सराफ यांनीही या काळात मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलेला असतो. त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. बाजारात खरेदी करताना मोबाईल किंवा पैसे वरच्या खिशात ठेऊ नये, गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्क करून हॅन्डल लॉक करून ठेवावे. कोणत्याही प्रकारे ऑनलाइनच्या आमिषाला बळी पडू नये.

ओटीपी कोणालाही शेअर करू नका.

फोनवर बँक खात्याचा एटीएमचा पासवर्ड, तसेच फोनपे, गुगलपे, पेटीएम इत्यादी प्रकारच्या ऑनलाइन ट्रान्जेक्शनबाबतचा ओटीपी कोणालाही शेअर करू नका. एमआयडीसी परिसरातील कंपनीमालक, तसेच वर्कशॉपमालक यांनी कंपनी बंद ठेवताना सुट्यांचे दिवसांतील सुरक्षिततेचा विचार करून सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे व इतर आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.  

नागरिकांनो, दिवाळीत बाहेर जाताय काळजी घ्या! पोलिसांचे शहरवासीयांना आवाहन 

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चोरटेही घराबाहेर पडले असून, सोनसाखळी चोरीसह घरफोट्या वाढल्या आहेत. त्यामुळे शहर पोलिसांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीच्या खरेदीला बाजारात जाताना घरात पैसे व्यवस्थित ठेवून जा. दिवाळी, विवाहाला बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू, पैसे बँकेत किंवा सोबत घेऊन जावे. बाहेरगावी जाणार असल्यास शेजाऱ्यांना, तसेच पोलिसांना बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी.

महिलांनी प्रवासात शक्यतो दागिने घालू नये

चेन स्नॅचिंग होऊ नये म्हणून बाहेरगावी जाताना महिलांनी प्रवासात दागिने घालून जाऊ नये, बाहेर रस्त्याने पायी जात असताना महिलांनी त्यांचे मंगळसूत्र झाकून चालावे. प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ, पिऊ नयेत. त्यात गुंगीचे औषधही असू शकते. प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध राहावे. गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना खिशातील पाकीट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT