नाशिक

गोळीबारात वाळुव्यवसायीक नगरसेवक जखमी

CD
भडगावात वाळूमाफियांचे घमासान --- गोळीबारात वाळू व्यावसायिक नगरसेवक जखमी; ग्रामस्थांकडून धुळ्याच्या टोळीकडून गोळीबाराची पुष्टी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : वाळू व्यवसायातील स्पर्धेतून भडगाव येथे वाळूमाफियांमध्ये तुफान राडा होऊन गोळीबार झाला. ही घटना रविवारी (ता. ८) पहाटे घडली. जखमीला नाशिकला हलविले असून, हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जखमीचे नाव लकीचंद पाटील असल्याचे सांगण्यात येते. भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी आणि वाहतूक होते. पोलिसांच्या भागीदारीत चालणाऱ्या या व्यवसायात भडगावातील सत्ताधारी पुढाऱ्याचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भडगावचे स्थानिक आणि धुळ्यातील वाळूमाफियांच्या गटात धुसफूस सुरू होती. फोन करून बोलावले रात्रभर गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा आणि उत्खनन होत असल्याने पहाटे संबंधित वाळू व्यावसायिक पुढाऱ्याला बहाण्याने बोलावण्यात आले. भडगाव- कडगाव रोडवर वरधा कराब फाट्यावर वाद होऊन धुळ्याच्या टोळीकडून झालेल्या गोळीबारात स्थानिक वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. घटना घडल्यावर वाळू व्यावसायिकांबरोबर रात्रपाळीच्या ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी जखमीला जळगावला न जाऊ देता थेट नाशिक येथील खासगी रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात येत आहे. कोट घडल्या प्रकारात आमच्याकडे काही नोंद नाही किंवा तक्रार नाही. गावातूनच माहिती मिळाली, की जखमी स्थानिक रुग्णालयात गेला होता. तेथे त्याने अंधारात काहीतरी लागल्याचे सांगितले. मात्र, नंतर त्याला नाशिकला हलविण्यात आले. नाशिक पोलिस त्या रुग्णालयात जखमीचा जबाब घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्याने जबाब दिलेला नाही. - महेश टाक, प्रभारी निरीक्षक, भडगाव पेालिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT