Two-wheeler thieves seized by Bhadrakali crime investigation team esakal
नाशिक

Nashik Crime News : भद्रकाली पोलिसांकडून 2 दुचाकी चोरट्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : भद्रकाली गुन्हे शोध पथकाकडून दोघा दुचाकी चोरट्यांना अटक करून दोन दुचाकी हस्तगत केल्या. दोघांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. आरटीओ कॉर्नर पंचवटी येथील यांची दुचाकी सोमवारी (ता. १५) ट्रॅक्टर हाऊस येथून चोरीस गेली होती.

बुधवार (ता. १७) रात्री गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी यांच्यासह नाना जाधव, संदीप शेळके, रमेश कोळी, धनंजय हासे, सागर निकुंभ, लक्ष्मण ठेपणे, संजय पोटिंदे, एस. एस. खेताडे, नितीन भामरे यांच्याकडून जुने नाशिक परिसरात गस्त सुरू होती.

दरम्यान कन्नमवार पूल परिसरात दोन जण संशयितरीत्या दुचाकी घेऊन जात असल्याचे त्यांना आढळून आले. (Bhadrakali police arrested 2 two wheeler thieves Nashik Crime News)

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दीपक वसंत मोंढे (२४), सुनील बाळू पारधी (२२), असे संशयितांचे नाव आहे. त्यांच्याकडील एका दुचाकीस नंबर प्लेट नव्हती. तर दुसरा दुचाकीची नंबर प्लेट त्यांनी गोल करून वाळून ठेवली होती.

कसून चौकशी केली असता, नानावली ट्रॅक्टर हाऊस परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडे मिळून आलेली दुसरी दुचाकी संशयितांनी चोरीच्या गुन्ह्यात वापरण्याचेही सांगितले.

दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. दोन्ही संशयित महापालिकेकडून वृक्ष छाटणीसाठी दिलेल्या ठेकेदाराचे कर्मचारी होते. दैनंदिन ते वृक्ष छाटणीच्या कामास शहरात येत होते. सोमवारी त्यांनी दिवसा वृक्ष छाटणीचे काम करत रात्रीच्या अंधारात दुचाकी लॉक छाटणीचे काम करून दुचाकी लंपास केली. अशी माहितीही चौकशीत समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT