Governor Bhagat Singh Koshari latest news sakal
नाशिक

Bhagat Singh Koshyari | मंत्र्यांनी कामे न झाल्यास थेट माझ्याकडे या : भगतसिंह कोश्यारी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मंत्र्यांकडून काम नाही झाले तर थेट माझ्याकडे या, मी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदिवासी बांधवांसह सर्वसामान्यांना दिलासा दिला. (Bhagat Singh Koshyari statement at tribal cultural festival nashik news)

राज्यपाल म्हणाले, आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन काम करत आहे. आदिवासींच्या विकासासाठी राज्यघटनेने राज्यपालांना काही विशेष अधिकार बहाल केलेले आहेत. देशातील अनेक राज्यपालांनी या विशेषाधिकारांचा वापर अद्याप केलेला नाही. मात्र मी राज्यात नियमांमध्ये योग्य तो बदल केला आहे. या माध्यमातून आदिवासींच्या ७७६ वनहक्क दाव्यांची सुनावणी घेणे शक्य झाले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीचे पैसे थेट जमा करण्याबाबत राज्य शासनाला मी सूचना केल्या. आता विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होत आहेत. छोटे छोटे बदल करून सर्वसामान्य जनेतेचे प्रश्न सोडविता येतात. त्यासाठी जनतेनेही एक पाऊस पुढे येत मंत्र्यांपर्यंत गेले पाहिजे.

आदिवासी विकास विभागातर्फे जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या आयुष्याच्या २५ वर्षांतच असे काम केले, की ते देवत्वापर्यंत पोचले. अशी अनेक देवमाणसे प्रत्येक आदिवासीच्या घरात निर्माण झाली पाहिजे.

जनजातीचे लोक केवळ आदिवासी, वनवासी नाहीत. आदिवासींनी बनविलेल्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी बाजारपेठेची आवश्यकता आहे. ही बाजारपेठ उपलब्ध झाल्यास त्यांच्या वस्तूंना चांगला भाव मिळेल. यासाठी सरकार पावले उचलतील. आदिवासी समाजातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार असो की राज्य सरकार, काम करत आहेत. आदिवासींनी आपली कामे पूर्ण करण्यासाठी एक पाऊस पुढे आले तर केंद्र आणि राज्य सरकार दोन पावल पुढे येतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

त्यांची मते लागणार आहेत...

राज्यस्तरीय आदिवासी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्बल अडीच तास उशिराने पोचले. उशिराने पोचलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात चिमटा घेतला. कार्यक्रमासाठी आदिवासी बांधव बारा वाजेपासून उपस्थित आहे. त्यांना आपली मते नको आहे, तर त्यांची मते आपल्याला लागणार आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना उशिराने आल्याची जाणीव करून दिली.

झिरवाळ यांनाही टोला

महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अनेकवेळा आदिवासींचे शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे येत असत आणि ही कामे करा, असे सांगत असत. मात्र आता माझ्याकडे येण्याची आवश्यकता नाही. थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जा. ते तुमचे कामे करतील. त्यांची कामे होतील, असे सांगत राज्यपाल कोश्यारी यांनी झिरवाळ यांना टोला लगावला.

राज्यपालांनी केली खरेदी

महोत्सवातील कला प्रदर्शानाचे राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी राज्यपाल कोश्‍यारी यांनी प्रदर्शनात स्टॉलवर जाऊन भेट दिली. याप्रसंगी त्यांनी बांबू टोपी खरेदी करत ती पालकमंत्री दादा भुसे यांना भेट दिली. नागली व वारली पेंटिंगची पैसे देऊन खरेदी केली. प्रदर्शनातून त्यांनी दीड हजारांची खरेदी केली. त्याचवेळी औक्षण करणाऱ्या महिलाला त्यांनी ओवाळणी देखील टाकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT