नाशिक

पहाट पाडवा संगीत मैफल

CD
फोटो : H34977 पहाट पाडव्याला भक्तिस्वराचा साज भजन, अभंग, देशभक्तिपर गीतांनी रसिक मुग्ध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : मखमलाबाद येथे दीपावली स्नेहमिलन व पहाट पाडवा संगीत सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भजन, अभंग, हिंदी-मराठी आणि देशभक्तिपर गीतांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मुग्ध केले. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, मखमलाबाद आणि जिजाई युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाचे यंदा चौदावे वर्ष होते. ब्रह्मचारी पुण्यश्लोक स्वामी, सचिन विधाते, यशोदीप जोशी, मधुरा दाणी, अनन्या दाणी, युवराज शिंदे यांनी सादर केलेल्या नमो नमोजी शंकरा, केशवा माधवा, जगन्नाथ, सोन्याचा पिंजरा यांसारख्या भक्तिगीतांनी मैफलीत रंग भरला. त्यानंतर ये वतन मेरे आबाद रहे तू आणि तेरी मिट्टी या देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावून गेले. कौस्तुभ भारोटे, तेजस विसपुते, चिन्मय कुलकर्णी, ईश्वर आंधळे यांनी साथसंगत केली. याप्रसंगी आमदार गोकुळ गिते, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश गिते, महापौर हिमगौरी आडके, माजी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक प्रमोद पालवे, हेमंत धात्रक, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, आर्ट ऑफ लिव्हिंगचे निवृत्ती काकड, विजय हाके प्रशिक्षक, स्वयंसेवक उपस्थित होते. प्रा. गणेश मोगल यांनी सूत्रसंचालन केले. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: 28 लाखांची बॅग घेऊन कर्मचारी पसार; पुणे पोलिसांचा 10 हजार किमी पाठलाग, अखेर चौघे जाळ्यात

U19 Asia Cup Final, IND vs PAK: भारताला वचपा काढण्याची संधी, पण पाकिस्तानने ठेवलंय भलंमोठं लक्ष्य, उस्मान खानचं शतक

अशोक सराफ यांचा दात पडण्याचा किस्सा ऐकून माधुरीलाही हसू अनावर; नेमकं काय घडलं होतं? Video

Latest Marathi News Live Update: मराठवाड्याच्या हक्काचं पाणी कधी मिळणार? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला प्रश्न

भरधाव कार पुलाला धडकून भीषण अपघात, कारचा चुराडा; तीन मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT