Bhandara  esakal
नाशिक

Nashik News : रामतीर्थावरील यात्रोत्सवात भंडाऱ्याची उधळण; ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जागर

सकाळ वृत्तसेवा

पल्‍लवी कुलकर्णी-शुक्‍ल : सकाळ वृत्तसेवा
नाशिक :
गोदावरीच्या तीरावरील रामतीर्थ परिसरातील खंडोबाचा यात्रोत्सव चंपाषष्ठीला मंगळवारी (ता. २९) होत असून, भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण मुक्तहस्ते होईल. त्याच वेळी ‘सदानंदाचा यळकोट', ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जागर होईल. यात्रोत्सवानिमित्त सोमवारी सकाळपासून व्यावसायिकांनी तयारी सुरू केली. (Bhandara spilling over during Yatra festival on Ram Teertha champa shashti nashik Latest Marathi News)

चंपाषष्ठीनिमित्त देवांचे टाक भेटीचा कार्यक्रम इथे होईल. गुरुवार (ता. २४)पासून षड्रात्रोत्सवास सुरवात झाली आहे. त्याची सांगता चंपाषष्ठीला होईल. रामतीर्थ परिसरातील खंडोबा स्थानाची अख्यायिका शहरवासीयांमध्ये प्रचलित आहे. पूर्वी आबा बेळे यांना झोपेत ‘मी पाण्याखाली आहे ,मला बाहेर काढ’, असा साक्षात्‍कार झाल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आबा स्‍नानासाठी गोदावरी तीरावर गेले असताना त्‍यांच्या पायाला खरखरीत दगड लागला.

त्‍यांनी त्‍याच्‍या भोवतीची स्‍वच्छता केली. त्‍यांना कोटम आकारातील (कोटम म्‍हणजे भंडारा असलेले चौकोनी पात्र) पूर्व-पश्‍चिम अशी दगडी कोरीव खंडोबा व म्‍हाळसा घोड्यावर आरूढ एक छोटी मूर्ती व शेजारी तिची प्रतिकृती मोठ्या आकारातील मूर्ती सापडली. हे खंडोबा स्‍थान गोदापात्रात आहे. तसेच ते पुराच्या पात्रात येत असल्‍याने पावसाळयात खंडोबा स्‍थान पाण्यात असते.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

खंडोबाचे नवरात्र

नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने
म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः
मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद् गुरुं
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम्


श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खंडेरायांची उपासना केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा षड्रात्रोत्सव. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टीला खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात.

सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय असल्याने आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेत भंडारा महत्त्वाचा. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.

तळी भरणे अन् दिवटी-बुधले

तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याचे पान, पैसे, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण ‘सदानंदाचा यळकोट', ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करत तीनवेळा उचलले जाते. त्यानंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात. मग प्रसाद वाटतात.

दरम्यान, दिवटी-बुधले याचे महत्त्व म्हणजे, मणी-मल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता, तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची अथवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास पायापासून डोक्यापर्यंत ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत (विझवावी) करावी.

"चंपाषष्ठी म्हणजे, त्रासापासून मुक्‍तीचा दिवस. आनंदाचा दिवस. यात्रेसाठी भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. यात्रेत भाविकांची मोठी रांग लागते. घरातील सर्व मंडळी मोठ्या उत्‍साहाने सोहळ्यात सहभागी होतात. उत्सवात सहभागी होणारी आमची ही सहावी पिढी आहे."
- यामिनी बेळे (पुजारी, खंडोबा मंदिर, रामतीर्थ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT