नाशिक

विहिरीत पडून पतसंस्थेच्या रोखपालाचा मृत्यू;

CD
भास्कर भोये ःVNI26B13489 --------------- वणी येथील पतसंस्थेच्या रोखपालाचा विहिरीत मृतदेह ------------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१२ : वणी येथील श्री गुरुदत्त बिगरशेती सहकारी पतसंस्थेत गेल्या २५ वर्षांपासून रोखपाल म्हणून कार्यरत असलेले भास्कर पोपट भोये (५२, रा. भातोडे, ता. दिंडोरी) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१०) घडली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात आहे की आत्महत्या, याबाबत वणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ऐन दीपावलीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे भातोडे गावासह वणी परिसरात शोककळा पसरली आहे. ----------- वणी पोलिसांत दाखल माहितीनुसार, भास्कर भोये मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास शेतातील कांदा व टोमॅटो पिकांना पाणी भरण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाने शेतात जाऊन शोध घेतला. ते आढळून न आल्याने नातेवाइकांच्या मदतीने शोध सुरू करण्यात आला. सायंकाळी सातच्या सुमारास गावकऱ्यांना त्यांच्याच गट क्रमांक १३२ मधील विहिरीत भास्कर भोये यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. पोलिस, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीबाहेर काढण्यात आले. मुलगा रोशन भास्कर भोये यांच्या माहितीनुसार पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. भास्कर भोये हे वणी येथील श्री गुरुदत्त बिगरशेती सहकारी पतसंस्थेत तब्बल २५ वर्षांपासून रोखपाल (कॅशियर) म्हणून कार्यरत होते. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली होती. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

SCROLL FOR NEXT