नाशिक

पन्नालालच्या निरोपानंतर भाट कुटुंबाचे गावाकडे प्रयाण

CD
NSK26H34500 नाशिक : गावाला जाण्यापूर्वी पन्नालालची भेट घेताना भाट कुटुंबीय. सोबत शिवसेनेचे दीपक डोके. -------------- ३६-२ पन्नालालच्या निरोपानंतर भाट कुटुंबाचे गावाकडे ----------- न्यायालयीन लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.४ : अनेक वर्षांपासून ज्याच्यासोबत संसाराचा गाडा ओढला त्या पन्नालालचा (गाढव) निरोप घेत भाट कुटुंबीय अखेर बुधवारी (ता.४) मूळ गावी परतले. कुटूंबातील सदस्याप्रमाणे वाढविलेल्या पन्नालालला नाशिकमध्येच सोडून जाताना भाट कुटुंहीयाला अश्रू अनावर झाले. श्री कालिका देवी यात्रोत्सवात पन्नालालच्या माध्यमातून भाट कुटुंबीय भाविकांचे मनोरंजन करत होते. परंतु पशुसंवर्धन कायद्यातंर्गत पन्नालालला ताब्यात घेत त्याची रवानगी गो-शाळेत करण्यात आली. त्यामुळे पन्नालालचे मालक असलेले भाट कुटुंबीय त्याच्या विरह सहन करत आहेत. पन्नालालच्या शोमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, पन्नालालपासून दुरावल्याने रोजगाराचे साधन हिरावले गेले. नाशिकसारख्या मोठ्या शहरात राहण्याची पर्यायी व्यवस्था नाही. खिशात पैसा नसल्याने राहणे व खाण्यापिण्याचा खर्च तसेच न्यायालयीन लढ्यासाठी वकिलाची फी भरण्याचीही आर्थिक क्षमता या कुटुंबाकडे उरलेली नाही. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये दिवस काढणे कठीण झाल्याने भाट कुटूंबाने मुळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी कुटूंबांने नातलग व मित्रपरिवाराच्या सहाय्याने आर्थिक मदत उभी करुन पन्नालालला पुन्हा मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे. पन्नालालला न्याय मिळवून देण्याची लढाई थांबणार नसली तरी या लढ्यासाठी आधी पैशांची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या पन्नालाल गोशाळेत आहे. एका मुक्या जीवाच्या प्रकरणात त्याच्या माणसांच्या कुटुंबावर ओढवलेल्या या परिस्थितीची दखल कोण घेणार? असा प्रश्‍न समाजाच्या विविध स्तरातून उपस्थित केला जाऊ लागला आहे. ------------------ फोटो क्रमांक :- एच-34500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Breach Candy Hospital : पुण्यात उपचारानंतर शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात; कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Latest Marathi News Live Update : ५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवाच! हर्षवर्धन सपकाळांचे मंत्र्यांना खुले आव्हान

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

Pune News: CSR निधीतून सुविधा देऊन खासगी बँकांकडून कोट्यवधींच्या ठेवींची जुळवाजुळव? अनास्करांची RBI कडे तक्रार

SCROLL FOR NEXT