नाशिक

दिवाळी पाडवा, भाऊबीजेने वाढणार दिवाळीचा गोडवा

CD
मेन शेजारी भाऊबिजेला औक्षणाचा मुहूर्त दुपारी १.२६ ते ३.४१ पाडव्याने वाढणार दिवाळीचा गोडवा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, पणत्यांचा लखलखाट, रांगोळ्यांचे रंग आणि फराळाचा दरवळ अशा उत्साही वातावरणात दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. दिवाळीतील महत्त्वाचे दोन सण असलेला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आणि भाऊबीज अनुक्रमे १० आणि ११ नोव्हेंबरला साजरी होणार आहे. या दोन्ही सणांना धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी राजा बळीचे पूजन केले जाते. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून राजा बळीकडून तीन पावले भूमी दानात घेतल्याची पौराणिक कथा या सणाशी जोडलेली आहे. व्यापारी वर्गात या दिवशी नवीन वर्षाच्या हिशेब वह्यांचे पूजन केले जाते. पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी पाडव्याला पत्नी पतीचे औक्षण करते. १० नोव्हेंबरला प्रतिपदा तिथी दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिवाळीचा समारोप भाऊबिजेने होतो. ११ नोव्हेंबरला कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी होईल. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या रक्षणाचे वचन देतो. भाऊबिजेचा औक्षण मुहूर्त दुपारी १.२६ ते ३.४१ असा आहे.फराळाची देवाणघेवाण, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि स्नेहमेळाव्यांमुळे या दोन दिवसांत दिवाळीचा उत्साह अधिकच खुलणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update: : धाराशिवच्या कौडगाव एमआयडीसीमधील सोलर प्लांटला भीषण आग; लाखो रुपयांच्या सोलर प्लेट्स जळून खाक, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

SCROLL FOR NEXT