SANJAY RAUT  GOOGLE
नाशिक

भोंग्याचं राजकारण आजचं संपलं - संजय राऊत

भोंग्यांमागील आवाज कोणाचा हे जनतेला कळलंय

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : या भोंग्यांच्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळलं आहे. त्यामुळं आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचं राजकारण संपलं आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणि भाजपला लगावला आहे. (Bhonga politics ended today Sanjay Raut reaction to Kolhapur elections)

राऊत म्हणाले, "नाशिक रामाची भूमी आहे, पण काही लोक हनुमान चालिसा वाचायला पुण्यात पोहोचले. हजारो शिवसैनिक मातोश्रीसमोर उभे आहेत. हिंदुत्व कोणाला शिकवताय. आज पाहिलं असेल कोल्हापूरचा निकाल लागला. या निवडणुकीला सुरुवात झाली, त्याच वेळी काही लोकांनी भोंगे हनिमान चालिसाचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवले आहेत. त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा कोल्हापूरला झाला नाही. एमआयएमकडून भाजप जे राजकारण करू इच्छित आहे. त्याचा दाखला कोल्हापूरच्या निवडणुकीत मिळाला. शिवसेना प्रमुखांची कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण लोकं असं स्वीकारत नाहीत. या भोंग्यांच्या मागील आवाज कोणाचा आहे, हे जनतेला कळलं आहे. त्यामुळे आज हनुमान जयंतीलाच भोंग्यांचं राजकारण संपलं आहे"

ज्या प्रकारचं राजकारण भाजप सध्या नवहिंदुत्ववादी ओवैसीकडून करु इच्छितो आहे, याचा काही उपयोग होणार नाही. कोल्हापूरचा निकाल हा त्याचा दाखला आहे. आता हिमालयात कोण जातंय पाहुयात. १९८७ मध्ये विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत प्रथम हिंदुत्वाची गर्जना केली होती. याची आठवण मला या निमित्तानं झाली. शिवसेनाप्रमुखांची भ्रष्ट कॉपी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण असे भोंगे लावून हिंदुत्व वाढत नाही लोक स्विकारत नाहीत. कारण भोग्यांचं राजकारण काय आहे, हे कोल्हापूरच्या जनतेनं महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व म्हणून दाखवून दिलंय, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT