नाशिक

गरजु दिव्यांगांना दिवाळी साहित्य वाटप

CD
BSW26B12202 भुसावळ : दिव्यांना दिवाळीचे साहित्य वाटप करताना प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, स्वाती नाईक, रजनी सावकारे, लता होसकोटे, आरती चौधरी आदी. ---------------- भुसावळला दिव्यांग महिलांना दिवाळीनिमित्त साहित्य वाटप ------- स्नेहदीपचा ''माणुसकीची दिवाळी'' उपक्रम सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. ६ : येथे खानदेश अंधकल्याण संघ संचलित स्नेहादीप निराधार अंध महिला संस्थेतर्फे रेल्वे सिनिअर इन्स्टिट्यूटमध्ये ‘माणुसकीची दिवाळी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिव्यचक्षू बंधू-भगिनींची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने संस्थेतर्फे प्रत्येकाला रवा, तेल, तूप, मैदा, डाळी, साखर, गूळ, साबण आदी दिवाळीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सक्षम कौन्सिलिंगच्या संचालिका आरती चौधरी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे उपस्थित होत्या. आरती चौधरी म्हणाल्या की, आनंद हा वाटल्याने वाढतो. म्हणूनच आम्ही दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून आनंद वाटण्याचा प्रयत्न करतो व त्यातूनच आमची दिवाळी खऱ्याअर्थाने आनंदमय होते. चांगल्या कार्यासाठी नेहमीच मदतीचे हात पुढे येतात, याचा प्रत्यय आज पुन्हा आला. प्रमुख पाहुण्यांनी उदार मनाने मदतीची तयारी दर्शविली, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. कावेरी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वागतगीत दिव्यचक्षू संजय बडगुजर यांनी सादर केले. आनंदा कोल्हे, स्नेहादिप संस्थेच्या संचालिका स्वाती नाईक, लता होसकोटे, कावेरी चौधरी, जयश्री दवे, मंगला पाटील, जयश्री पाटील आदी महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT