नाशिक

भुसावळमध्ये एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; चौघांना अटक

CD
भुसावळला अडीच लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त --- किन्ही एमआयडीसीत कारवाई; चौघांना अटक, दोन दुचाकी, चार मोबाईल हस्तगत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. भुसावळ तालुका पोलिसांनी किन्ही एमआयडीसी परिसरात शुक्रवारी (ता. ६) पहाटे छापा टाकून सुमारे दोन लाख ४८ हजार ८४० रुपयांचे ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले व चौघांना अटक केली असून, दोन दुचाकी आणि चार मोबाईल, असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भुसावळ तालुका पोलिसांना किन्ही एमआयडीसी परिसरात एमडी ड्रग्जची विक्री व साठवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी पहाटे दोन वाजून ५५ मिनिटांनी परिसरात छापा टाकला. संशयितांकडून ६२.२१ ग्रॅम एमडी पावडर हस्तगत करण्यात आली. यापैकी ५५.३३ ग्रॅम एमडी असगरखान अन्वरखान याच्याकडून जप्त करण्यात आले. संशयित रिषभ कुणाल खेडकर (वय १८, रा. कंडारी, भुसावळ), प्रथमेश दिलीप आव्हाड (२७, दादासाहेब रुपवते सोसायटी, भुसावळ), शेख अफजल शेख रहेमतुल्ला (२६, नसरंजी फाईल, भुसावळ) आणि असगरखान अनवरखान (५७, अयान कॉलनी, भुसावळ) या चौघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी एमडी पावडरसह दोन दुचाकी आणि चार मोबाईल जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालात एमडी पावडरची किंमत दोन लाख ४८ हजार ८४० रुपये, दुचाकींची किंमत तीन लाख २५ हजार रुपये, तर मोबाईलची किंमत एक लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकट कारवाई सुरूच राहणार या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परिवीक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी तथा भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

MBBS Admission: लाखो इच्छुक तरी एमबीबीएसच्या जागा रिक्त का? नीट उत्तीर्ण असूनही अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे का स्वप्न भंगले?

Vaibhav Chavan Case news: वैभव चव्हाणला जीवाची भीती होती? मृत्यूपूर्वीच्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खळबळ!

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

Ahmednagar District Bank : विखे, कोल्हे की राजळे? अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेच!

SCROLL FOR NEXT