Railway sakal
नाशिक

भुसावळ-नाशिक पुणे रेल्वे 'या' तारखेपासून सुरू होणार

कोरोनामुळे ही गाडी २२ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : पुण्याला जाण्यासाठी परवडणारी आणि सोयीची असणारी भुसावळ- नाशिक- पुणे एक्स्प्रेस रेल्वेगाडी १० जुलैपासून पुन्हा सुरू होत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने दिली आहे. कोरोनामुळे ही गाडी २२ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. आता दोन वर्षांच्या खंडांनंतर ती सुरू होत आहे. त्यामुळे प्रवाशांना आनंद झाला आहे.

या गाडीचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांतील प्रवाशांना होणार आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर पंचवटीसारख्या इंटरसिटी ट्रेनला रिझर्व्हेशनऐवजी जनरल करण्यात आले आहे. आणखी काही गाड्या जनरल करण्यास सुरवात झाली आहे. इगतपुरी-भुसावळ ही पॅसेंजर गाडी मेमू ट्रेनच्या स्वरूपात काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली आहे.

पुण्याला जाताना ही गाडी पहाटे नाशिकला येते. तेथून सुमारे सहा तासांनी पुण्याला पोचते. ही गाडी सध्या बंद असल्यामुळे नाशिककरांना बस आणि खासगी वाहनाने पुणे गाठावे लागत आहे. नाशिक-पुणे रेल्वेगाडी स्वस्त आहे. तिच्यापेक्षा रस्तामार्गे किमान तिप्पट भाडे लागते. स्पेशल चारचाकी गाडी केली तर हा खर्च अनेक पटींनी वाढतो. काही जण पंचवटी, राज्यराणीसारख्या गाडीने कल्याणला उतरून तेथून पुण्याला जाणारी रेल्वेगाडी पकडतात. परंतु, त्यात जास्त वेळ लागतो. अनेकदा जागा मिळत नाही. आता हक्काची नाशिक-पुणे गाडी सुरू होत असल्याने हा सर्व ताणतणाव वाचून प्रवाशांची पैसा व वेळेची बचत होणार आहे. गाडीत झोप मिळाल्याने प्रवासही आरामदायी होणार आहे. नाशिकचे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुण्यात राहतात. अनेक युवक पुण्यात नोकरी करतात, त्या सर्वांसाठी ही सोयीची होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

Mumbai Local Megablock: रविवारी सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द; कसे असेल वेळापत्रक?

Live Updates Marathi : खड्डेमय रस्त्यांचा आणखी एक बळी, ३९ दिवसांच्या झुंजीनंतर आजींचा मृत्यू

Brazil Football: ब्राझीलचा फुटबॉल संघ भारतात येणार? कोलकात्यात रंगू शकतो मेगा सामना; रिपोर्टने वाढवल्या चाहत्यांच्या आशा

PM Modi Latest Video : 'या' एका व्हिडिओमुळे इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदी ट्रेंडिंग; १२ तासात वाढले १.१ मिलियन फॉलोअर्स

SCROLL FOR NEXT