नाशिक

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भूषण कासलीवाल यांच्याकडून १ लाख ११ हजारांची मदत

CD
02466 मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १ लाख ११ हजार रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधी धनादेश सपूर्त करताना नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भूषण कासलीवाल यांची आर्थिक मदत सकाळ वृत्तसेवा गणूर, ता. १८ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी चांदवड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भूषण जयचंदजी कासलीवाल यांनी सामाजिक दायित्वातून १ लाख ११ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे. मुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात त्याची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध स्तरांवर मदतकार्य आणि उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या शासकीय मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कासलीवाल यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही आर्थिक मदत दिली. संकटाच्या काळात केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योगदान द्यावे. अशा सामूहिक प्रयत्नांतून गरजू आणि दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळू शकतो, अशी भावना यामागे असल्याचे भूषण कासलीवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

Junnar Farmers : शेतीचा वाढता उत्पादन खर्च रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; बनकर फाट्यात कांदा लागवड ७००, पुरुष मजुरी ८०० आणि इतर कामांसाठी ५०० रुपये दर

Instagram वर ब्लू टिकसाठी आता पैसे देण्याची गरज नाही! जाणून घ्या अकाउंट मोफत व्हेरिफाय करण्याची सोपी ट्रिक...

Satara Bank Election: जिल्हा परिषदेचा बदला घेतला, शिवसेना-राष्ट्रवादीनं भाजपचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT