नाशिक

मालेगावच्या भुईकोट किल्ल्यात २८ नोव्हेंबरला दीपोत्सव : शिवजन्मोत्सव देखाव्यासह विविध आकर्षण

CD
भुईकोट किल्ल्यात २८ नोव्हेंबरला दीपोत्सव सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. १७ : येथील भुईकोट किल्ल्यात असलेल्या रंगमहालात दोन दिवस दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबरला सायंकाळी सहापासून होणाऱ्या या सोहळ्यात नेत्रदीपक विद्युत रोषणाई, १ हजार पणत्यांसह शंभर मशाली प्रज्वलन करण्यात येणार आहेत.यावेळी शिवजन्मोत्सवाचा जिवंत देखावा, ऐतिहासिक शस्त्र व दुर्मिळ नाणे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मालेगावकरांना अनुभवायला मिळणार आहे. यानिमित्ताने रंगमहाल परिसरात स्थानिक कलाकारांच्या सहभागातून पारंपरिक गाण्यांचा व गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे. दीपोत्सवात संपूर्ण किल्ल्यावर एलईडी व लाइट्सच्या माध्यमातून रोषणाई करण्यात येणार आहे. प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सरकारच्या''अमृत'' संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या दुर्गोत्सवांतर्गत शहरात ६ ते २५ नोव्हेंबर दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी ''मातीचे व टाकाऊ वस्तूंपासून किल्ले बनवा स्पर्धा'' आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दीपोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात होणार आहे. ------- शस्त्र, दुर्मीळ नाण्यांचे प्रदर्शन वडनेर खाकुर्डी येथील योगेश चौधरी यांच्या ''शिवछंद इतिहास साहित्य संग्रहालया''च्या सहकार्याने ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरवले जाणार आहे. यामध्ये ३० ते ४० ऐतिहासिक शस्त्रे, शिवकालीन व पारंपरिक नाणी, विविध देशांच्या नोटा, टपाल तिकिटे, पोस्टकार्ड्स तसेच अपरिचित दुर्मिळ पुस्तके पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Retire : महेंद्रसिंग धोनीने '7' चे गणित इथेही गाठले; चेपॉकवर निवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले, शेवटचा सामना कुठे व केव्हा खेळला?

यष्टिंमागचा 'योद्धा'; जो सामन्याला द्यायचा सहज कलाटणी, नाव सांगायची गरज नाही...

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Latest Marathi News Live Update : अमित शाहांवर टीका करणारे थापाडे, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

SCROLL FOR NEXT