Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News: दुभाजकाला आदळून दुचाकीस्वार युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

: सातपूर एमआयडीसीतील कंपनीत रात्रपाळीसाठी निघालेल्या कामगाराची दुचाकी दुभाजकाल आदळली आणि या अपघातात दुचाकीस्वार कामगार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सदरची घटना मध्यरात्री एबीबी सर्कल ते लवाटेनगर या रस्त्यावर घडली. (Bike rider killed after hitting divider Nashik Accident News)

विशाल अभिमान मासूळ-पाटील (२०, रा. डीजीपी नगर-१, आंबेडकरनगर, पुणे राेडजवळ, मूळ रा. चित्ताेड, जि. धुळे) असे मृत कामगाराचे नाव आहे.

विशाल हा रविवारी (ता. १३) मध्यरात्री दीड वाजता डीजीपीनगर येथून सातपूर एमआयडीसीतील कंपनीत रात्रपाळी ड्युटीसाठी दुचाकीने (एमएच १५ बीडब्ल्यू ०७१५) निघाला हाेता. ताे उंटवाडी सिग्नलकडून सिटी सेंटर माॅलच्या रस्त्याने जात असताना, मूहुर्त शाेरुमसमाेरील दुभाजकावर त्याची दुचाकी जाऊन आदळली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या अपघात गंभीर दुखापत हाेऊन ताे रक्ताच्या थाराेळ्यात निपचित पडून हाेता. ही घटना गंगापूर पाेलिसांना कळताच पाेलिस शिपाई एस. जी. पवार यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका यंत्रणेस संपर्क केला.

यावेळी उपनिरीक्षक मुंढे, हवालदार रामदास खुळात दाखल झाले. त्यांनी विशाल याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डाॅ. पगार यांनी तपासून मृत घाेषित केले. तपास हवालदार खुळात करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT