Nashik accident Esakal
नाशिक

Nashik Accident News : लोखंडी ॲंगल वाहतूक करणाऱ्या टेम्पोला धडक; दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जकात नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला लोखंडी ॲंगलची वाहतूक करणाऱ्या मिनी टेम्पो थांबलेला असता, त्यावर भरधाव वेगातील दुचाकी येऊन धडकली. यात सिडकोतील पशुवैदयक दुचाकीस्वाराच्या पोटात लोखंडी ॲंगल घुसल्याने ते जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरील घटना सोमवारी (ता. २७) सायंकाळी पाच-साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली.

दीपक धर्मा आहेर (४१, रा. महेश मेडीकल समोर, गणेश चौक, सिडको) असे मृत पशुवैद्यकाचे नाव आहे. नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंत्राटदाराचा मिनी टेम्पो (एमएच ०९ सीए ८०३५) विल्होळी येथील जकात नाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभा होता. टेम्पोतून लोखंडी ॲंगलची वाहतूक केली जात असतानाच, टेम्पोचालक हा टेम्पोतील लोखंडी अँगल घसरत असल्याने ते तो पॅक करीत होता. तर, पशुवैद्यक आहेर हे सोमवारी (ता.२७) सायंकाळी पाच वाजता पॅशन प्रो दुचाकीवरुन (एमएच १५ सीवाय ०१२८) नाशिककडून वाडीवऱ्हेच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आहेर यांच्या दुचाकीला पाठीमागील दुसऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते टेम्पोवर पाठीमागून जाऊन आदळले.

या दुर्दैवी घटनेत टेम्पोतून बाहेर आलेले लोखंडी अँगल त्यांच्या पोटात शिरल्याने अतिरक्तस्त्राव होऊन ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना गौळाणे येथील शंकर तपासे यांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत दीपक व त्यांच्या कुटुंबाचे घटनेच्या काही तासांपूर्वीच फोनवर बोलणे झाले होते. दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच, त्यांच्या कुटुंबाने रुग्णालयात धाव घेत हंबरडा फोडला. या घटनेमुळे सिडकोतील गणेश चौक परिसरात शोककळा पसरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT