crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : 1 मिनिटांचा ब्रेक पडला महागात; मोबाईलसह दुचाकी पळविली

नरेश हाळणोर

नाशिक : लघुशंका करण्यासाठी रस्त्यालगत थांबले असता, पार्क केलेली मोबाईलसह दुचाकीच चोरट्याने पळवून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bike stolen with mobile phone Nashik Crime News)

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

कपिल प्रदीप सुर्वे (रा. शिवशक्ती नगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, ते गडकरी चौकाकडून चांडक मार्गे दुचाकीवरून जात होते. त्यांना लघुशंका लागल्याने ते या रोडवरील एलआयसी ऑफिससमोर असलेल्या महाराष्ट्र वखार महामंडळ येथे थांबले आणि रस्त्यालगत लघुशंकेला गेले.

त्यावेळी त्यांनी रस्त्यालगत पार्क केलेली २५ हजार रुपयांची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १४ सीआर ५८४३) आणि विवो कंपनीचा ११ हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. लघुशंका करून परत आलेल्या सुर्वे यांना त्याची दुचाकी मिळून आली नाही.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक उपनिरीक्षक आडके हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT