Crime  esakal
नाशिक

Nashik Crime: 24 तासाच्या आत दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : दुचाकी चोरट्याला ताब्यात घेण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयिताकडून पंचेचाळीस हजार रुपयांची मोपेड ताब्यात घेण्यात आली आहे.

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. (Bike Theft Crime Solved Within 24 Hours Performance of Panchavati Crime Investigation Team Nashik Crime)

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या बघता त्या उकल करण्या संदर्भात आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने कामकाज करीत असताना पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना एक संशयित हमाल प्लॉट परिसरातून दुचाकी ढकलत घेउन चालला असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार यांचे सह पथकाचे कर्मचारी पोलीस ठाणे हे हमाल प्लॉट परिसरात धाव घेतली. दुचाकी ढकलत घेऊन जात असलेल्या संशयितास पोलिस येत असल्याची चाहूल लागताच मोपेड टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पंचवटी गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून संशयित उत्तम जगन गरड वय ३४, रा. बिल्डिंग न. २, घर ४५, निलगिरी बाग, औरंगाबाद रोड, नाशिक) यास ताब्यात घेतले. या संशयिताकडून एमएच १५ जीएस ३३८६ हस्तगत करण्यात आली.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, मिथुन परदेशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलिस नाईक महेश नांदुर्डीकर, राकेश शिंदे, संदिप बाविस्कर, जयवंत लोणारे, पोलिस अंमलदार कुणाल पचलोरे, वैभव परदेशी अशांनी कामगिरी केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : पुण्यात चुलत भावाकडूनच तरुणाची निर्घृण हत्या

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Pay and Park Issue : इस्कॉन मंदिराजवळील ‘पे अँड पार्क’मध्ये वाहनचालकांची लूट; महापालिकेच्या भक्तिवेदांत पार्किंगमधील प्रकार

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

SCROLL FOR NEXT