bike thief & police esakal
नाशिक

Nashik Crime News : दुचाकी चोरीचे सत्र सुरूच; पोलिसांचीच सरकारी दुचाकी पळवली!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दुचाकी चोरट्यांची मजल आता थेट पोलिसांचे गस्ती वाहन असलेली दुचाकी चोरून नेण्यापर्यंत पोचली आहे. तर, याशिवाय शहर हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. दिवसेंदिवस दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार सातत्याने सुरू असून, पोलिसांची ॲन्टी व्हेईकल थीफ स्क्वॉड हे प्रकार रोखण्यात अपयशी ठरल्याचेच चित्र आहे. (Bike theft session continues government bike of police theft Nashik Crime News)

हवालदार नरेंद्र शिवाजी चौधरी (रा. पोलिस हाउसिंग सोसायटी, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना शहरात गस्त घालण्यासाठी सरकारी दुचाकी (एमएच- १५ - ८२०४) देण्यात आलेली आहे. सदर दुचाकी त्यांनी शुक्रवारी (ता. ६) वॉशिंगसाठी आडगाव येथील डी- मार्टशेजारी असलेल्या ऋतुजा वॉशिंग सेंटर येथे लावली होती.

ती ते परत घेण्यासाठी गेले असता, चोरी गेली होती. याप्रकरणी आडगाव येथे गुन्हा दाखल झाला आहे. कैलास गणपत पगारे (रा. अपेक्षा अपार्टमेंट, जेल रोड) यांची दुचाकी (एमएच- १५- बीक्यू- ४५१६) गेल्या ९ नोव्हेंबरला गौरी पटांगणावरून अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

अमित प्रकाश अग्रवाल (रा. गणेश भवन, रविवार पेठ) यांची मोपेड (एमएच- १५- एचएक्स- ४७७४) ३ डिसेंबरला पहाटे अज्ञात चोरट्याने राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोएब हनिफ शेख (रा. रेणुकानगर सोसायटी, वडाळा नाका) यांची मोपेड (एमएच- १५-१७९२) ४ डिसेंबरला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT