Arrest esakal
नाशिक

नाशिक : बिंगो रोलेट जुगाराचा सूत्रधार कैलास शहा गजाआड

कुणाल संत

नाशिक : बिंगो रोलेट जुगाराच्या माध्यमातून राज्यातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या बिंगो रोलेट किंग कैलास शहा यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. संशयित कैलास शहा ग्रामीण पोलिसांनी शहरातून अटक केली. या जुगाराचा मुख्य सूत्रधारालाच पोलिसांनी गजाआड केल्याने फसवणूकीची अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे.

वावी ठुशी (ता.निफाड) येथील रामराव रसाळ (वय ३७) या तरुण दलालाच्या माध्यमातून संशयित कैलास शहा (वय ३२, रा. गंगापूर रोड) आणि प्रितम गोसावी (पिंपळगाव बसवंत) यांच्या संपर्कात आला होता. संशयित आरोपी यांनी रामराव यांचा विश्‍वास संपादन करत संशयित शहा यांनी रामराव रसाळच्या मोबाईल कमांकावर बिंगो रौलेट फनगेम नावाचे अॅप्लिकेशनची लिंक सेंड करून ती डाऊनलोड करून देत ऑनलाईन बिंगो रौलेट जुगार खेळण्यासाठी लागणारा मुख्य आयडी आणि पासवर्ड पाठवुन ०१ पॉईंटला ३६ रूपये या दराने पैसे मिळतील असे सांगुन फिर्यादीस आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा होणे करीता बिंगो रौलेट जुगार खेळण्यास भाग पाडले. त्यानंतर या दोघा संशयित यांनी रसाळ यांची तब्बल ४५ लाख ४४ हजार ३१५ रुपयाची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर ही रक्कम अदा करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला.

रामराव रसाळ यांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी याप्रकरणात तरूणाची झालेली फसवणूक लक्षात घेता बिंगो रोलेट या जुगाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पथकास मार्गदर्शन करत ह्यातील संशयित यांना अटक करण्यासाठी नियोजन आखले. त्यानंतर या जुगाराचा किंग कैलास शहा हा नाशिक शहरात असल्याची माहिती त्यांना मिळताचा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शहरातून संशयित कैलास जाधव यास अटक केली. यातील दुसरा संशयित प्रितम गोसावी मात्र फरार झाला आहे. संशयित शहा यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अनेक तरुणांच्या आत्महत्या

संशयित कैलास शहा याने अनेक तरुणांना या बिंगो रोलेट जुगारात पैशांचे आमिष दाखवून खेळण्यास भाग पाडले होते. यामुळे झालेल्या फसवणुकीतुन तरूणांचे आणि विद्यार्थी यांचे मोठे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होत असुन आत्महत्याही केल्या आहे, तसेच काही तरुण जिंकण्याच्या अमिषानं कर्जबाजारी झाले आहे. आपली घरे, दुकान मोटर वाहने, स्थिर स्थावर मालमत्ता विक्री करावी लागली आहे.

कैलास शहावर जिल्ह्यात १२ गुन्हे

बिंगो रोलेट जुगाराचा मुख्य सूत्रधार कैलास शहा यांच्यावर शहर व ग्रामीण भागातील नाशिक तालुका, गंगापूर, भ्रदकाली, पंचवटी पोलीस ठाणे, पिंपळगाव. त्र्यंबकेश्‍वर,ओझर, दिंडोरी या सर्व पोलीस ठाणेमध्ये एकूण १२ गुन्हे दाखल आहे. यासह इतर जिल्ह्यात देखील कैलास शहावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहे.

''बिंगो रोलेट जुगाराच्या माध्यामातून संशयित शहा यांने अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी आपल्या जवळील पोलीस ठाण्यात गुन्हे तक्रार द्यावी. यासह या जुगाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम मिळविण्याच्या उद्देशाने देखील प्रत्यन केले जातील. कैलास शहा विरुद्ध मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे.'' - सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT