ghubad 1.jpg
ghubad 1.jpg 
नाशिक

मांजाचा दोर उठतोय पक्ष्यांच्या जीवावर! घुबडाच्या मानेभोवती पडला मांजाचा वेढा

दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मकरसंक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपळगाव शहरात पतंगोत्सवासाठी सर्रास मांजा विक्री सुरू आहे. पतंगाच्या मांजाचे दोर मात्र पिंपळगाव शहरातील नागरिक व पशू-पक्ष्यांच्या जिवावर उठले आहेत. अशातच झाडावर विसावा घेत असताना मंगळवारी (ता. १२) घुबड जातीच्या पक्ष्याच्या मानेभोवती मांजाचा वेढा पडला..त्यानंतर...

घुबडाच्या मानेभोवती मांजाचा वेढा
पिंपळगाव शहरात मांजा विक्री राजरोस सुरू आहे. पतंगप्रेमी मुक्तपणे मांजाचा वापर करताना दिसत आहेत. मंगळवारी हा मांजाचा दोर पक्ष्यांच्या जिवांना घोर लावणारा ठरला. दगूनाना मोरेनगरमध्ये घुबड मांजाच्या विळख्यात अडकून जखमी झाले. नागरिकांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर पक्षीमित्र राजेंद्र पवार, विक्रम गिते, स्वप्नील देवरे, अग्निशमन दलाचे सुनील मोरे यांना पाचारण करण्यात आले. जखमी घुबडाला झाडावरून काढून मांजाच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले

पक्षी पुन्हा एकदा आकाशात उडण्यासाठी सज्ज

झाडावर विसावा घेत असताना मंगळवारी (ता. १२) घुबड जातीच्या पक्ष्याच्या मानेभोवती मांजाचा वेढा पडला. पिंपळगाव अग्निशमन दल व पक्षीप्रेमींनी त्या घुबडाला मांजाच्या फासातून मुक्त करून जीवदान दिले. प्राथमिक उपचारानंतर हा पक्षी पुन्हा एकदा आकाशात उडण्यासाठी सज्ज झाला. 

मांजा विक्रेत्यांना चाप लावण्याची मागणी

पशुवैद्यकीय अधिकारी अल्केश चौधरी यांनी प्राथमिक उपचार केले. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी एक नागरिक दुचाकीवरून जात असताना मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाला होता. तर त्या वेळी एका घुबडालाही मांजामुळे रक्तबंबाळ व्हावे लागले. मांजा विक्रेत्यांना चाप लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

मांजा पशू-पक्षी व नागरिकांना धोकादायक ठरत आहे. मांजा विक्री करणाऱ्यांनी विक्री त्वरित थांबवावी. अन्यथा कटू कारवाईला सामोरे जावे लागेल. पिंपळगाव शहरात मांजा विक्री होणार नाही, यासाठी प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. -गणेश बनकर, सदस्य, ग्रामपंचायत, पिंपळगाव बसवंत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT