नाशिक

बाडगीची माची येथे राघोजी भांगरे यांच्या स्मृतींना अभिवादन; पिंपळगाव मोर येथे आदिवासी संस्कृतीचा जल्लोष

CD
05421 पिंपळगाव मोर : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपस्थित मान्यवर. राघोजी भांगरे यांच्या स्मृतींना अभिवादन पिंपळगाव मोरला आदिवासी संस्कृतीचा जल्लोष सकाळ वृत्तसेवा घोटी, ता. १७ : राघोजी भांगरे यांच्या ऐतिहासिक वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेल्या बाडगीची माची येथे परिसराची स्वच्छता करून त्यांच्या स्मृतीस्थळी दीपप्रज्वलन व अभिवादन करण्यात आले. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे जनजाती गौरव सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक यांच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील बाडगीची माची व पिंपळगाव मोर येथे विविध कला, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. या प्रसंगी पारंपरिक आदिवासी वेशभूषा, वाद्ये व सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी दीपोत्सवही साजरा करण्यात आला. पिंपळगाव मोर येथे आदिवासी समाजाच्या पारंपरिक रूढी, परंपरा व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारे नृत्य, गायन, वादन व लोककलेचे कार्यक्रम झाले. कार्यक्रमास आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, उपआयुक्त राजेंद्रकुमार हिवाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. गायक संदीप गवारी व कवयित्री कविता मडके यांनी सांस्कृतिक सादरीकरण केले. सोमनाथ कातडे यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी महिला व शेतकऱ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षभेट देण्यात आली. कार्यक्रमास नवनाथ खादे, सीताराम खोंडे, मनोज कराटे, मदन बेंडकोळी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, महिला, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT