नाशिक

बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव कटिबद्ध

CD
(पान ३ ला मेन) फोटो : NSK26H34381/ NSK26H34388 दादार : जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माहितीपत्रकाचे प्रकाशन करताना रवींद्र चव्हाण, सतीश धोंड, डॉ. हेमंत विष्णू सवरा, राजेश पांडे, संजय पुराम, राजेश पाडवी, संतोष जनाटे, विरेंद्र शहा आदी. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित डॉ. सुप्रिया गावित. --------------- बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी कटिबद्ध डॉ. हीना गावित यांचे प्रतिपादन; जनजातीय गौरव दिन कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३ : महान स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य गावा- गावातील प्रत्येक आदिवासी घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजातीय गौरव दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम यशस्वी करूया. भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्यास आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे विचार भाजपच्या जनजातीय गौरव समितीच्या सहसंयोजक माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी व्यक्त केले. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशतर्फे मुंबई (दादर) येथील वसंतस्मृती कार्यालयात आयोजित ‘जनजातीय गौरव दिन कार्यशाळा’ तसेच भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात झाली. त्या वेळी डॉ. गावित बोलत होत्या. या वेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सह संघटनमंत्री सतीश धोंड, खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार संजय पुराम, आमदार राजेश पाडवी, महाराष्ट्र राज्य जनजाती आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, संतोष जनाटे, विरेंद्र शहा आदी उपस्थित होते. आदिवासी समाजाची वज्रमूठ उभारत ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व करणारे महान स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकार १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा शौर्यशाली इतिहास आणि प्रेरणादायी विचार जनमानसापर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे विचार या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मांडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सह संघटनमंत्री सतीश धोंडजी, खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार संजय पुराम आदींच्या हस्ते आदिवासी वीर पुरुषांच्या प्रतिमेचे तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank New Rules: 'या' बँकेने बदलले नियम! 1 डिसेंबरपासून रोख रक्कम भरणे आणि काढण्यावरही मर्यादा

Aditya Thackeray: ‘एकरी पाच हजारही उत्पन्न मिळणार नाही’; कपाशीची अवस्था पाहून आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Chhatrapati Sambhajinagar News: अपहरणाची तक्रार, दहा दिवसांचा शोध अन् अखेर चेंबरमध्ये मृतदेह; करमाडमधील कंत्राटदाराच्या मृत्यूचे गूढ कायम

Latest Marathi News Live Update: महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले

Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

SCROLL FOR NEXT