बिरसा मुंडा ः फोटो घेणे
३६-२
ओझरखेड धरणाजवळ
बिरसा मुंडा यांचे स्मारक
-------
२१ फूट उंच पुतळा ः चार कोटींची खर्च
-------
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर,ता.१२ ः ओझरखेड धरणाजवळ पाच एकर क्षेत्रात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक साकारण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत दिली. हा पुतळा २१ फूट उंचीचा असेल, त्यासाठी चार कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.
--------------
पालकमंत्री म्हणाले,‘ क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीन या आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीविरोधात त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करून लढा दिला. त्यांचे बलिदान संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे आहे. ओझरखेड धरणाजवळ भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक साकारण्यात येणार आहे. या धरण परिसरातील पर्यटन सुविधांचा विकास आणि क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची उभारणी या कामासाठी चार कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तेथे २१ फूट उंच पुतळ्यासह वृक्षारोपण करण्यात येईल. यामुळे ओझरखेड धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टिने विकसित होण्यास मदत होईल. तसेच स्थानिक पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
जिल्हा विकास आराखड्यांतर्गत जिल्ह्याला प्रोत्साहनात्मक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचा, आदिवासी समाजाच्या संघर्षाचा आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव होणार आहे.
राज्य शासनाच्या ॲस्ट्रो टुरिझम धोरणांतर्गत सुरगाणा तालुक्यातील उधमाळ या ठिकाणाचा विकास करण्यता येत आहे. लोकसंख्या कमी आहे म्हणून कोणत्याही नागरिकाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. या सप्ताहात न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण, स्मारकांची स्वच्छता आणि दीपोत्सव, आधार कार्ड व शासकीय कागदपत्रे सेवा शिबिर, आरोग्य व पोषण जनजागृतीपर शिबिर, आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिवस साजरा होईल.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.