नाशिक

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त लोककल्याणकारी उपक्रम राबविणार

CD
फोटो : NSK26H34906 नंदुरबार : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ. हीना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, तहसीलदार संतोष डेरे आदी. --- क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त उपक्रम आमदार गावित : जनजातीय गौरव सेवा सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन नंदुरबार, ता. १२ : जनजातीय गौरव सेवा सप्ताह हा आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करणारा उपक्रम आहे. जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ यशस्वी करावा, असे आवाहन माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, भाजप जनजातीय गौरव महोत्सवाच्या प्रदेश सहसंयोजक, माजी खासदार डॉ. हीना गावित, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी पत्रकार परिषदेत केले. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि विविध प्रशासकीय विभाग यांच्या माध्यमातून १८ नोव्हेंबरपर्यंत विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत नंदुरबार तहसील कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेला नंदुरबार तहसीलदार संतोष डेरे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार येथील सहायक प्रकल्प अधिकारी किरण मोरे उपस्थित होते. या वेळी डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, की भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची जयंती १५ नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिन म्हणून जिल्हाभरात साजरा होणार आहे. आदिवासी बांधवांच्या आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी विविध विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सिकलसेल रुग्णांना उपचार व शासकीय लाभ, दुर्गम भागातील नागरिकांचे आधार कार्ड अद्ययावतीकरण, तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा गौरव करण्यावर भर आहे. डॉ. हीना गावित म्हणाल्या, की सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, आरोग्य व शैक्षणिक सुविधांबाबत जनजागृती करणे, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. डॉ. सुप्रिया गावित यांनी बिरसा मुंडा यांची जयंती भव्य स्वरूपात साजरी केली जाणार असल्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

IRCTC Shimla-Manali Winter Special Tour Package : नोव्हेंबरच्या अखेरीस शिमला-मनाली फिरण्याची सुवर्णसंधी; IRCTC कडून 'विंटर स्पेशल टूर पॅकेज' जाहीर, टॉय ट्रेनचा प्रवास ते विमानाची सुविधा एकाच पॅकेजमध्ये

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Pune News : पुणे महापालिका बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT