Farande, Dhikle, Borse, Rahul Aher esakal
नाशिक

Nashik BJP News: मध्य प्रदेशात प्रचारासाठी भाजपकडून फरांदेंसह नाशिकच्या चौघांना पाचारण

सकाळ वृत्तसेवा

Nashik BJP News : लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षासाठी लिटमस टेस्ट ठरणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष जिल्ह्यातील चार आमदारांना प्रचाराच्या मैदानात उतरवणार आहे.

त्यात ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह दिलीप बोरसे यांचा समावेश आहे. (BJP calls four people from Nashik including Farand to campaign in Madhya Pradesh nashik)

वर्षअखेरीस मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व मिझोराम या चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपसाठी मध्य प्रदेश व राजस्थानच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप ताकही फुंकून पित आहे.

राजस्थानमध्ये गुजरातमधील आमदार, तर मध्य प्रदेशात महाराष्ट्रातील ५० आमदार भाजपच्या प्रचार कार्यात उतरणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतदेखील नाशिकमधील आमदारांना मैदानात उतरण्यात आले होते.

नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे मध्य प्रदेशमधील खरगोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. देवयानी फरांदे व बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे आमला मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

डॉ. राहुल आहेर यांच्याकडे नरसिंग विधानसभेच्या प्रचाराचे सूत्र असतील. प्रचारकार्यात उतरण्यापूर्वी इंदूर येथे आमदारांचे प्रशिक्षण होणार आहे. या आमदारांना मतदारसंघात दहा दिवस तळ ठोकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यादरम्यान प्रचारतंत्र राबवितानाच शक्ती केंद्रप्रमुख, मंडलप्रमुख व मतदारसंघातील प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT