bjp esakal
नाशिक

सत्ताधारी भाजपला घरचा आहेर; भाजप नगरसेवकाकडूनच इशारा

विक्रांत मते

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या (muncipal corporation elections) पार्श्‍वभूमीवर विकासकामांचा बार उडविण्याची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली असली तरी अद्याप कामांना सुरवात न झाल्याने सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. मतदारांशी प्रतारणा करता येणार नसल्याचे सांगताना कामे न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा भाजपचे नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी देत सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिला. (BJP-corporator-warns-ruling-BJP-nashik-marathi-news)

सत्ताधारी भाजपला घरचा आहेर

पूर्ण बहुमताने महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर विकासकामे वेगाने पुढे जातील, अशी अपेक्षा फोल ठरली. साडे चार वर्षांपासून सर्वपक्षीय नगरसेवक विकासकामांसाठी ओरड करत असताना भाजपकडून त्यावर तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले जाते, परंतु माजी गटनेते व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी शुक्रवारी (ता.१८) विकासकामांवरून महापौर कुलकर्णी यांना धारेवर धरल्यानंतर सत्ताधारी भाजपची पंचाईत झाली. चालू आर्थिक वर्षाचे प्रशासन, स्थायी समिती व महासभेचे अंदाजपत्रक मंजूर झाले असताना अद्यापही कामांना सुरवात नाही. पावसाळ्यात कामे बंद राहतात. पावसाळा संपल्यानंतर निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. त्यापूर्वी किमान कामांच्या कार्यारंभ आदेश ठेकेदारांना मिळणे गरजेचे असल्याचे मत श्री. मोरुस्कर यांनी मांडताना महापालिकेत सत्ता असली तरी निवडणुकीत नागरिकांना दिलेल्या आश्‍वासनांची वचनपूर्ती करावी लागणार आहे. मतदारांशी प्रतारणा करता येणार नाही. विकासकामे झालीच पाहिजे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई करण्यात आली. त्याबदल्यात महापालिकेकडे तोडफोड खर्च अदा करण्यात आला आहे, त्यातून तातडीने रस्त्यांची दुरुस्तीची मागणी त्यांनी केली.

महापालिकेत भाजपची सत्ता असली हे मान्य असले तरी मतदारांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा प्रतारणा होईल. त्यामुळे आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. - संभाजी मोरुस्कर, माजी गटनेता, भाजप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT