sudhakar badgujar esakal
नाशिक

भाजपचा सुधाकर बडगुजर यांना ‘दे धक्का’!

विक्रांत मते

नाशिक : त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील उड्डाणपुलाला विरोध करत शिवसेनेचे (shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (sudhakar badgujar) यांच्या विरोधात दोन हात करणाऱ्या भाजपने (bjp) आज एक पाऊल पुढे जात बडगुजर ॲन्ड बडगुजर कंपनीच्या दहा वर्षांतील ठेक्याची माहिती मागवीत जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे. सभागृहनेते कमलेश बोडके यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र लिहून माहिती मागविल्याने महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर (elections) भाजपकडून शिवसेनेला घेरताना निवडणुकीचे अप्रत्यक्ष रणशिंग फुंकले. (BJP-criticized-to-Sudhakar-Badgujar-nashik-marathi-news)

भाजपचा सुधाकर बडगुजर यांना ‘दे धक्का’! कंपनीच्या दहा वर्षांच्या ठेक्याची मागविली माहिती

शहरात मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे अडीचशे कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूल तयार केले जाणार आहे. परंतु उड्डाणपुलावरून सत्ताधारी भाजप व शिवसेनेत आव्हाने-प्रतिआव्हान दिली जात असल्याने राजकारण तापले आहे. महासभेत ‘उड्डाणपूल रद्द करून दाखवा, राजकारण सोडेन’, असे आव्हान बडगुजर यांनी दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी उड्डाणपुलांच्या कामाच्या आग्रहा मागचे गौडबंगाल काय, असा सवाल करत बडगुजर यांची कोंडी केली. त्यानंतर सभागृहनेते कमलेश बोडके यांनी रस्ते कामाचा मुद्दा उपस्थित करत ठेकेदारांची रिंग करणारा शिवसेनेचा नेता कोण, असा सवाल उपस्थित करताना बडगुजर यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला. तसेच, उड्डाणपुलाच्या कामात सकृतदर्शनी ठेकेदार आणि शिवसेनेचा संबंधित पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध दिसत असून, यासंदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे पडताळून सादर केले जातील. उड्डाणपुलाचे काम रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. बडगुजर ॲन्ड बडगुजर कंपनी संबंधित असल्याचा दावा करीत दहा वर्षांत महापालिकेत या कंपनीच्या माध्यमातून किती कोटी रुपयांची कामे झाली, याची माहिती सभागृहनेते बोडके यांनी मागविल्याने संघर्ष विकोपाला जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे.

भाजपची निवडणूक व्यूहरचना

गेल्या साडेचार वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात ठेकेदारांचा पक्ष असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आता भाजपने शिवसेनेच्या नेत्यांच्या ठेक्यांची पोलखोल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी करण्याची व्यूहरचना आखली आहे. भाजपच्या या निवडणूक व्यूहरचनेला आता शिवसेना कसे उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून मे. बडगुजर ॲन्ड कंपनी फर्मच्या नावे कुठल्या विभागाचे व कोणती कामे घेतली. या कामांची नावे व कामांच्या प्राकलनाची रक्कम या संदर्भात तीन दिवसांत लेखी स्वरूपात माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. -कमलेश बोडके, सभागृहनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Independence Day 2026: ७९वा की ८०वा? यावर्षी भारत कितवा स्वातंत्र्यदिन साजरा करणार?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आण्णासाहेब डांगेंचा सत्कार सोहळा संपन्न

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

SCROLL FOR NEXT