नाशिक

पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी

CD
अँकर --- NSK26H35102 नंदुरबार : दिवाळी स्नेहमेळाव्यास उपस्थित आमदार राजेश पाडवी. शेजारी विजय चौधरी, नीलेश माळी. --- पक्ष संघटन बळकटीसाठी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी विजय चौधरी : भाजपतर्फे दिवाळी स्नेहमेळावा उत्साहात सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. कार्यकर्त्यांच्या सुख- दुःखात आणि संकटकाळात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, असे प्रतिपादन भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केले. विजयपर्व येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला आमदार राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, भाजप महिला जिल्हाध्यक्ष डॉ. समिधा नटावदकर, प्रा. मकरंद पाटील, शहादा उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विजय चौधरी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचा व राज्याचा कारभार सुरळीत सुरू आहे. जनहिताला प्राधान्य देत सरकार विविध विकासकामे राबवीत आहे. शासनाच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी म्हणाले, की विजय चौधरी हे कुशल संघटक असून, पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देतात. आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम आणि संघटनात्मक नियोजन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे. --- चौकट पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करावे पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. विजय चौधरी यांची पक्षाविषयीची तळमळ मोठी आहे. पक्ष आणखी मोठा कसा होईल, यासाठी त्यांची धडपड असते. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखाची, वैयक्तिक अडचणींची, तसेच पक्षकार्याची ते विचारपूस करीत असतात. ही त्यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची पावती आहे, असे आमदार राजेश पाडवी यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : सोलापूरनंतर आता 'स्वाभिमानी'चा मोर्चा बारामतीकडे; ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी कारखान्यांना २५ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT