Neo Metro
Neo Metro  sakal
नाशिक

नाशिक मेट्रोचा नारळ फोडण्याची भाजपची तयारी

विक्रांत मते

नाशिक : केंद्रीय अंदाजपत्रकात घोषणा होवूनही मेट्रो निओचा नारळ फुटत नसल्याने शिवसेनेच्या (Shivsena) हाती अपप्रचाराचे आयते कोलीत हाती लागण्याच्या शक्यतेने दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याकडे मेट्रो निओची सल व्यक्त झाल्यानंतर तातडीने पावले उचलत प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याची तयारी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर साधारण १५ मार्चच्या आत प्रकल्पाचे उद्‌घाटन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने उद्‌घाटन होण्याची तयारी असली तरी राज्याचे सर्व नेते नाशिकमध्ये उद्‌घाटनासाठी आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी ऑक्टोबर २०१८ रोजी नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोकडून करण्यात आले. नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली होती. त्यानुसार टायरबेस मेट्रो सेवेसाठी दिल्ली येथील राईटस कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. ऑगष्ट २०१९ मध्ये 'मेट्रो निओ' असे प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मेट्रो निओ प्रकल्पासाठी २०९२ कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली. प्रकल्पासाठी २१००. ६ कोटी खर्च येणार असून राज्य सरकार, सिडको व महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये तर १,१६१ कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहे. प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे.

कोरोनामुळे मेट्रो निओ प्रकल्पाला फटका बसला. कोरोनाचा अडथळा आला नसता तर आतापर्यंत एजन्सी नियुक्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली असती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेट्रो निओचा प्रकल्प आवडल्याने वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात प्रकल्प होण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. वाराणसी बरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोरखपूर विधानसभा मतदारसंघात प्रकल्प सुरू करायचा असल्याने त्यासाठी आता येत्या २५ जानेवारीपर्यंतचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला होता. परंतु, तांत्रिक कारणाने लांबला.

आता मार्चचा दुसरा आठवडा

दोन आठवड्यांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले होते. त्या वेळी मेट्रो निओचा विषय छेडला. आमदार जयकुमार रावल यांनी चार ते पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे भाषणात म्हणाले, ती चुक सुधारताना फडणवीस यांनी अंदाजपत्रकात मंजुरी मिळाल्यानंतर दोनदा कॅबिनेटच्या मंजुरीला फाइल जाते, असे सांगितले. त्यानंतर प्रकल्प उद्‌घाटनासाठी हालचाली गतिमान झाल्या त्याचाच, एक भाग म्हणून आता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

मुदत वाढणार

नाशिक मेट्रोसाठी २०२३ ची डेडलाईन होती, परंतु अद्यापपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी न मिळाल्याने काम सुरू झाले नाही. त्यामुळे आता मार्च महिन्यात उद्‌घाटन झाल्यास वर्षभर प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. केंद्र सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कडून पहिल्या कॉरिडॉर ३६ व दुसऱ्या कॉरिडॉरसाठी १४, असे एकूण पन्नास डब्याचे (कोच) डिझाईन, उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT