नाशिक

भाजप उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक

CD
NSK26H34115 धुळे : भाजप कार्यालयात झालेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय संघटनात्मक बैठकीस उपस्थित भाजपचे प्रदेश संघटनमंत्री अजय जामवाल. शेजारी सतीश धोंड, पालकमंत्री जयकुमार रावल, माधवी नाईक, मंगेश चव्हाण, रवी अनासपुरे, गजेंद्र अंपळकर आदी. --- भाजपच्या बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर --- उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक; जनसंपर्क वाढविण्याचा निर्धार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : भारतीय जनता पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक बळकटीकरणाची बैठक येथील (कै.) महादेव अंपळकर स्मृती भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली. उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे बैठकीत भाजप प्रदेश संघटनमंत्री अजय जामवाल, प्रदेश सहसंघटनमंत्री सतीश धोंड यांनी मार्गदर्शन केले. पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार तथा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश मुख्यालय कार्यालयप्रमुख रवी अनासपुरे, आमदार तथा प्रदेश चिटणीस मंगेश चव्हाण, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्यासह धुळे महानगर, धुळे ग्रामीण, मालेगाव, नंदुरबार, जळगाव शहर, जळगाव पूर्व (रावेर) आणि जळगाव पश्चिम या संघटनात्मक क्षेत्रांतील अध्यक्षांसह जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा घेत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः बूथस्तरावरील संघटनात्मक रचना अधिक प्रभावी करणे, मंडलनिहाय कामाला गती देणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे, तसेच केंद्र सरकार व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले. संघटनात्मक शिस्त, सातत्यपूर्ण जनसंपर्क, कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि जनतेच्या प्रश्नांप्रति संवेदनशील भूमिका या माध्यमातून पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणणारी ही बैठक आगामी नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Positive Story: इतिहास घडला! जेल भोगत असलेल्या आईच्या लेकराला नर्सरीत प्रवेश; कारागृहाच्या दारात येणार स्कूल बस

Gokul Election Officer Transfer : गोकुळच्या घडामोडींना नवे वळण; निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांची ४५० किलोमीटर दूर बदली

Marathi News Live Updates : "तुम्ही पळून जाऊ शकत नाहीत!" राहुल गांधींचा मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट इशारा; भाजपकडून 'इंडिया' आघाडीच्या मॉक पार्लमेंटवर सडकून टीका

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची धोक्यात? ‘इंडिया’ आघाडीचा मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात जनता महाभियोग, नेमके काय आरोप केले?

Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

SCROLL FOR NEXT