Chandrashekhar Bawankule esakal
नाशिक

Nashik BJP: कार्यकारिणी नियुक्तीवेळी सोशल इंजिनिअरिंगवर भर; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik BJP News : भारतीय जनता पक्षातर्फे नाशिक शहर व जिल्ह्यासाठी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात लवकरच नवीन कार्यकारिणी नियुक्त करताना त्यात सर्वसमावेशकपणा असेल, याची काळजी घ्यावी, सोशल इंजिनिअरिंगवर अधिक भर द्यावा, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. (bjp State President Bawankule Instructions to office bearers Emphasis on social engineering in executive appointments nashik)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकरी समृद्ध केंद्राचे उद्‌घाटन तसेच पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नाशिकमध्ये आले होते.

कार्यक्रमानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी विधानसभा मतदारसंघ ६० हजार घरांपर्यंत पोचण्यासंदर्भातील मोहिमेची माहिती दिली.

सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष विजय साने, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शंकर वाघ, माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी आमदार बाळासाहेब सानप, बाळासाहेब पाटील, पवन भगूरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी ते म्हणाले, की प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ६० हजार घरांमध्ये पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. घरोघरी योजनांचे पत्र कुटुंबात वाटून त्यांच्या मोबाईलवरून भाजपच्या संपर्क अभियानासाठी दिलेल्या मोबाईलवर मिस कॉल करण्यासाठी हे अभियान राहणार आहे.

‘संपर्क असे समर्थन’ या अभियानांतर्गत पक्षाची सदस्य संख्या वाढवली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मिशन २०२४ अंतर्गत लोकसभा जिंकण्याचे पक्षाचे ध्येय असून, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT