black flag esakal
नाशिक

शेतकरी व कामगार आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी घरावर काळे झेंडे!

शेतकरीविरोधी तीन कायदे परत घ्यावे, शेतीमालाला किमान हमीभाव देण्याचा कायदा करावा यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू आहे.

महेंद्र महाजन

नाशिक : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणि कामगारांच्या आंदोलनाला सहा महिने होत आहेत. त्यास पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या ऑनलाइन बैठकीत २६ मेस घरावर काळे झेंडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. (Black flags at home in support of the farmers and workers movement)

केंद्र सरकारने शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावले?

शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक संघटना हे आंदोलन करतील. तसेच २४ ते ३० मेस जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. भाजपच्या लोकप्रतिनिधींना मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर प्रतिक्रिया मागण्यात येतील. त्यात आमदार, खासदारांचा समावेश असेल. याशिवाय २४ ते ३० मेस शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्‍नांसंबंधी देशस्तरावर ऑनलाइन व्याख्यान होतील. ऑनलाइन बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुभाष लांडे होते. राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, सचिव राजू देसले, राजन क्षीरसागर, बन्सी सातपुते, हिरालाल परदेशी, डॉ. महेश कोपुलवार, नामदेव चव्हाण, अशोक जाधव, भास्कर शिंदे, विजय दराडे, दत्तात्रय गांगुर्डे यांनी संवादात सहभाग घेतला. देसले म्हणाले, की २६ मेस पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यास सात वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत केंद्र सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगारांना देशोधडीला लावले. शेतकरीविरोधी तीन कायदे परत घ्यावे, शेतीमालाला किमान हमीभाव देण्याचा कायदा करावा यासाठी देशव्यापी आंदोलन सुरू आहे. खतांच्या किमती वाढवून पुन्हा कॉर्पोरेट कंपन्यांना १४ हजार कोटी रुपये अनुदान दिले. आता या खेळीत पुन्हा खतांच्या किमती पूर्ववत करून शेतकऱ्यांना आम्ही दिलासा दिल्याचे नाटक वटवले जात आहे.

''कोरोनाची महामारी देशात आणण्यासाठी केंद्र सरकारची बेजबाबदार धोरणे कारणीभूत आहेत. पोकळ घोषणा करायच्या आणि त्यांची अंमलबजावणी शून्य, हे पंतप्रधानांचे कर्तृत्व देशवासीयांच्या जीवावर उठले. राजकारण आपण पाहत आहोत. आतापर्यंत ४५ वर्षांवरील निम्म्या लोकसंख्येलाही कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळू शकली नाही. कोणतेही नियोजन न करता थाळ्या व टाळ्या वाजवण्याचे कार्यक्रम केंद्र सरकारने आत्तापर्यंत घेतले आहेत.''
-राजू देसले, सचिव, किसान सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT