Crime News esakal
नाशिक

Ration Scam Crime : शासकीय धान्याचा काळाबाजार; रेशन दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Ration Scam Crime : जुन्या आग्रा रोडवरील कालिका मंदिरा पाठीमागे असलेल्या सहवासनगर येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानात साठ्यापेक्षा जादा धान्य साठा आढळून आला असून, काळ्या बाजारात धान्याची अफरातफर केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Black market of government ration case registered against ration shopkeeper at sahavasnagar nashik news)

अविनाश नारायण माळी (५३, रा. जनरल वैद्य नगर, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे. धान्य वितरण विभागाचे सिडको विभागाचे पुरवठा निरीक्षक राहुल सिताराम डोळस यांच्या फिर्यादीनुसार, संशयित माळी यांच्या नावे सहवासनगरमधील जीवनरक्षा सोसायटीतील गाळा क्रमांक तीनमध्ये शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे.

पुरवठा निरीक्षक डोळस हे गुरुवारी (ता. ८) दुपारी साडेबाराच्या सुमारास सहवास नगरमधील शासकीय स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२४ येथे गेले होते. त्या वेळी सदर दुकानामध्ये त्यांना साठ्यापेक्षा जादा धान्य साठा आढळून आला.

डोळस यांनी तपासणी केली असता, या दुकानातून शासकीय स्वस्त धान्याची अफरातफर व काळाबाजार केला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी मुंबई नाका पोलिसात माळी यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मन्सुरी हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

Controversy on Marathi: मराठी न बोलल्याने तरुणाला मारहाण! तणावातून विद्यार्थ्याने जीवन संपवले; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

EPFO: महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार; केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार

माझ्या तोंडात शिव्या येतायत... कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणाऱ्या सरकारला सयाजी शिंदेंनी विचारला जाब; आवाज उठवणाऱ्याला दाबलं जातंय...

SCROLL FOR NEXT