blodd clots
blodd clots esakal
नाशिक

लसीकरणानंतर रक्तस्राव-रक्ताच्या गुठळ्या होण्याचे भारतातील प्रमाण अत्यल्प

महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनाची लस (corona virus vaccination) दिल्यानंतर रक्तस्राव तथा रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. लसीकरणोत्तर विपरीत परिस्थितीविषयक राष्ट्रीय समितीने आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाला (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या अहवालात ही माहिती दिली. अस्ट्राझेंका-ऑक्सफर्ड (भारतात कोव्हिशील्ड) लस घेतल्यानंतर रक्तप्रवाहात अडथळा येण्याच्या अथवा रक्ताच्या गुठळ्या (Blood clots) होणे या घटनांबद्दल काही देशांमध्ये ११ मार्च २०२१ ला धोक्याची सूचना देण्यात आली होती. या घटनांच्या संदर्भाने भारतात लशीच्या विपरीत परिणामांचे सखोल विश्लेषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Bleeding-blood clots after vaccination)

राष्ट्रीय समितीकडून आरोग्य मंत्रालयाकडे अहवाल सुपूर्द

राष्ट्रीय समितीने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार ३ एप्रिलपर्यंत लशीचे सात कोटी ५४ लाख ३५ हजार ३८१ डोस देण्यात आले. त्यात कोव्हिशील्डच्या सहा कोटी ८६ लाख ५० हजार ८१९ आणि कोव्हॅक्सिनच्या ६७ लाख ८४ हजार ५६२ डोसचा समावेश होता. त्यापैकी पहिल्या डोसची संख्या सहा कोटी ५९ लाख ४४ हजार १०६, तर दुसऱ्या डोसची संख्या ९४ लाख ९१ हजार २७५ इतकी होती. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून २३ हजारांपेक्षा अधिक विपरित परिणामांची नोंद कोरोना मंचावर झाली. देशातील ७५३ पैकी ६८४ जिल्ह्यांमध्ये अशा नोंदी झाल्या. त्यातील ७०० (म्हणजे दर दशलक्ष डोसमागे ९.३) व्यक्तींची स्थिती गंभीर असल्याचे नोंदले आहे. अशा ४९८ गंभीर व तीव्र प्रकरणांचा आढावा राष्ट्रीय समितीने घेतला. त्यातील २६ व्यक्तींच्या रक्तात गुठळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही गाठ रक्तवाहिनीतून वाहत जाऊन दुसऱ्या वाहिनीचा प्रवाह थांबवू शकते. कोव्हिशील्ड लस घेतल्यानंतर असे परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असून, तसे होण्याचा दर दहा लाख डोसमागे ०.६१ इतका आहे. मात्र कोव्हॅक्सीन लस दिल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होणे अथवा तशी शक्यता असण्याच्या प्रकारांची नोंद झाली नाही.

इंग्लंडमध्ये चार आणि जर्मनीत दहा प्रमाण

राष्ट्रीय समितीच्या भारतातील आकडेवारीनुसार रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या धोक्यांची संख्या अत्यल्प असली, तरी तसे धोके सुनिश्चित करता येतील, असे आहेत. असे प्रकार होण्याचा दर दहा लाख डोसांमागे इंग्लंडमध्ये चार, तर जर्मनीत दहा इतका आहे. सर्वसामान्य जनतेत अशा पद्धतीने रक्तात गुठळ्या होऊ शकतात. वैज्ञानिक लिखाणात असे दिसते, की दक्षिण आणि आग्नेय आशियाई वंशांच्या व्यक्तींमध्ये युरोपीय वंशांपेक्षा त्याचा धोका सुमारे ७० टक्के कमी असतो. कोणतीही कोरोना प्रतिबंधक लस (विशेषतः कोव्हिशील्ड) घेतल्यावर २० दिवसांत संभाव्य रक्तात गुठळ्या होण्याच्या लक्षणांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि लशीच्या लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना जारी करत आहे. तसे झाल्यास जेथून लस घेतली, त्या केंद्राला तसे कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संभाव्य विपरीत परिणामांची नोंद

कोव्हिशील्ड या कोरोना प्रतिबंधक लशीचे ‘धोका-फायदा’ गुणोत्तर सकारात्मक अथवा हितावह असून, संसर्ग टाळण्याचे व कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याचे तिचे सामर्थ्य मोठे आहे, हेच साऱ्या जगासाठी व भारतासाठी सत्य आहे. भारतात आजपर्यंत कोव्हिशील्ड लशीचे १३ कोटी ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सर्व कोरोना प्रतिबंधक लशींच्या सुरक्षिततेवर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे लक्ष असून, संभाव्य विपरीत परिणामांची नोंद करण्याचा मंत्रालयाकडून आग्रह धरला जात आहे.

लसीकरणानंतर त्रासाची लक्षणे

० श्‍वास घेता न येणे

० छातीत दुखणे

० हातापायांमध्ये वेदना अथवा हातपाय दाबल्यावर दुखणे अथवा हातापायांवर (दंड अथवा पोटरी) सूज

० इंजेक्शन घेतल्याच्या जागेपलीकडे टाचणीच्या टोकाएवढे अनेक लाल ठिपके, त्वचेखाली मुकामार लागल्यासारखे दिसणे

० उलट्यांसहित अथवा उलट्यांविना सतत पोट दुखणे

० फेफरे येण्याचा शारीरिक इतिहास नसतानाही उलट्यांसहित अथवा उलट्यांविना फेफरे येणे

० उलट्यांसहित अथवा उलट्यांविना सतत डोकेदुखी (अर्धशिशी अथवा जुनाट डोकेदुखीचा इतिहास नसतानाही)

० शरीराच्या एखाद्या बाजूच्या हातापायात थकवा वाटणे अथवा अर्धांगवायू होणे (चेहऱ्यासह)

० कोणत्याही ठोस कारणाशिवाय सतत उलट्या होणे

० धूसर दिसणे अथवा डोळे दुखणे अथवा दोन-दोन दिसणे

० मानसिक स्थितीत बदल, संभ्रमावस्था, नैराश्य

० अन्य एखादे लक्षण, ज्याबद्दल संबंधित व्यक्तीला अथवा तिच्या कुटुंबीयांना काळजी वाटेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT