arvind sonar esakal
नाशिक

आश्चर्यच! कोरोनाची लस घेतली अन् शरीराला आले चुंबकत्व?

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कोरोनावरील लस.. (corona vaccine) पण हीच लस घेऊन तुमच्या शरीरात समजा चुंबकत्व निर्माण झाले आणि शरीराला सर्व वस्तू अचानक चिटकायला सुरूवात झाली तर....बसला ना आश्यर्याचा धक्का...होय..हे खरं आहे. नाशिकच्या सिडको परिसरात शिवाजी चौकात राहणारे 71 वर्षीय अरविंद जगन्नाथ सोनार यांना हा अनुभव येतोय. (body-become-magnetic-after-corona-vaccination-nashik-marathi-news)

लस घेतल्यानंतर धातूच्या वस्तू थेट चिटकताएत

नाशिकच्या सिडको भागातला हा प्रकार आहे. अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर सकाळने याचा पाठपुरावा केला. यात काही फसवेगिरी नाही ना याचा शोधही घेतला. यावेळी अरविंद सोनार यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या घरी जाऊन हा प्रकार तातडीने तपासला. कोविशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccination) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. असे सोनार यांनी सांगितले. यावेळी सोनार यांनी वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून दाखवल्या.

तपासणी करूनच प्रतिक्रिया - जिल्हा आरोग्य अधिकारी

दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस त्यांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला होता. त्यानंतर लस घेतल्यावर चुंबकत्व निर्माण होते असे समजल्यावर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला. तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आले. या संदर्भात तपासणी करूनच प्रतिक्रिया देऊ असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

डॉक्टर म्हणतात..

"त्यांनी ज्या खासगी रुग्णालयात लस घेतली आहे, त्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. मात्र असा प्रकार घडल्याचा यापूर्वी कुठलाही विषय आलेला नाही" -उमेश मराठे, लाईफ केअर हॉस्पीटल, संचालक

हा नक्की काय प्रकार आहे?

"मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे" - अरविंद सोनार, ज्येष्ठ नागरिक, सिडको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT