Death esakal
नाशिक

Nashik Crime: अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांपुढे आव्हान

दिपक खैरनार : सकाळ वृत्तसेवा

अंबासन : चोंढी (ता.मालेगाव) येथील शिव टेकडी मंदिरानजीक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. (body of an unknown person was found nashik news)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोंढी येथील शिवटेकडी मंदिरानजीक एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचा भ्रमणध्वनीव्दारे माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

एका रूग्णावाहिकेतून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय आधिकारी डाॅ. अनुसया यांनी तपासणी केली. मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान असून सदर इसमाचे वय अंदाजे पन्नास ते पंचावन्न आहे.

रंगाने काळसर, उंची पाच फुट, शरीराने सडपातळ, चेहरा लांबट व दाढीचे, डोक्यावर केस वाढलेले, अंगात लालसर रंगाचे स्वेटर, तपकिरी रंगाची नाईट पॅट व पायात काळसर रंगाचे शाॅक्स, उजव्या हातावर होम चिन्ह व साक्षी नाव गोंदण केलेले असून याबाबत कोणाला माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन मालेगाव तालुका पोलीसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT