Villagers of Shirwade Wani demanding strict action against the suspect esakal
नाशिक

Nashik : बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : सय्यद पिंपरी (ता. निफाड) येथील विवाहिता दीपाली राजेश ढिकले शिरवाडे वणी येथून गुरुवारी (ता. १९) सायंकाळी सातपासून बेपत्ता झाली होती. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद झाली होती.

याप्रकरणी बेपत्ता महिलेचा पती संशयित म्हणून पिंपळगाव पोलिसांच्या ताब्यात होता. तब्बल पाच दिवसानंतर बेपत्ता विवाहितेचा मृतदेह निफाड तालुक्यातील पाचोरा फाटा येथील हॉटेल माखनचोरसमोर रस्त्याच्या कडेला एका नाल्यात पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

याबाबत माहिती मिळताच पिंपळगाव पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. संशयितावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. याप्रकरणी पिंपळगाव बसवंतचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करीत आहेत.

नागरिक संतप्त...

शिरवाडे वणी (ता. निफाड) येथील बाळासाहेब हरी निफाडे यांची दीपाली कन्या होती. दीपाली मृतावस्थेत आढळल्याने नागरिक संतप्त झाले. मुलीचा मृतदेह पाहून निफाडे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पिंपळगाव पोलिस ठाण्यात शेकडो ग्रामस्थ जमा होऊन गुन्हेगारावर कडक कारवाईची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT