death body.jpg 
नाशिक

मरणानंतरही यातना सुरुच..! सात तास उलटूनही तरुणाच्या मृतदेहाची फरपटच 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : सोयगाव भागातील जयरामनगरातील मंगळवारी मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची फरपट झाली. सात तासांनंतर कुठलीही सुरक्षा उपाययोजना न करता आई व भावाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या तरुणाला वेळीच उपचार मिळाले असते किंवा 24 एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले असते, तर त्याचे प्राण वाचू शकले असते. प्रशासनाच्या हलगर्जीचा तो बळी ठरल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 
 
बंदोबस्तावरील पोलिसांची तपासणी 
दरम्यान, बुधवारी (ता. 29) पॉझिटिव्ह आलेल्या 11 जणांमध्ये कॅम्प, आयेशानगर, पोलिस नियंत्रण कक्षासह दरेगाव व निहालनगर पोलिस चौकीतील पोलिस व दोन एसआरपी जवानांचा समावेश आहे. निहालनगर चौकी कुसुंबा रस्त्यावर आहे. या भागात मोठ्या संख्येने संक्रमित असल्याची भीती येथे सेवारत एका डॉक्‍टरांनी व्यक्त केली होती. पोलिस दलातील वाढती रुग्णसंख्या पाहता सोयगाव भागातील बालाजी लॉन्समध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सुधीर तांबे यांच्या पुढाकाराने व एसएमबीटीच्या सहकार्याने बंदोबस्तावरील पोलिसांची तपासणी सुरू केल्याचे डॉ. प्रदीप नाईक यांनी सांगितले. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त

पश्‍चिम भागातील शाळा-महाविद्यालये ताब्यात 
वाढती रुग्णसंख्या व क्वारंटाइनची संख्या लक्षात घेता पूर्वपाठोपाठ आता पश्‍चिम भागातील शाळा, महाविद्यालयांच्या इमारती रुग्णांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यासाठी ताब्यात घेतल्या जात आहेत. इमारतींची पाहणी, व्यवस्थेची जबाबदारी शहर अभियंता कैलास बच्छाव, तर क्वारंटाइन करण्याची मोहीम मुख्य लेखापाल कमरुद्दीन शेख यांच्यावर सोपविली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT