Fake Doctor arrested esakal
नाशिक

Nashik : मालेगावी बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील पूर्व भागात गल्ली- मोहल्ल्यांमध्ये छोटे- मोठे मोहल्ला क्लिनीक सुरु आहेत. या मोहल्ला क्लिनिकचा फायदा घेत येथील तोतया डॉक्टर चक्क दोन खोल्यांचा दवाखाना बांधून रुग्णांवर उपचार करीत होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई करत अन्सारी मोहम्मद वसीम अब्दुल रशीद या तोतया डॉक्टरचे पितळ उघडे पाडले. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.(bogus doctor exposed in malegaon Nashik latest news)

शहरात अनेक ठिकाणी असे पदवी नसलेले बोगस डॉक्टर आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील दातारनगर भागात सुरु असलेल्या दवाखान्यात छापा टाकला असता सदर डॉक्टर बोगस असल्याचे आढळून आले. अन्सारी मोहम्मद वसीम अब्दुल रशीद असे या बनावट डॉक्टरचे नाव आहे.

वसीमचा या भागात किती दिवसांपासून दवाखाना सुरु आहे, यासंदर्भात पोलिस तपास करणार आहेत. त्याच्यावर पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहम्मद अन्सारीला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नाजीम शेख व सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर बडगुजर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT