Fake Medical Certificate case esakal
नाशिक

Bogus Medical Certificate Case : ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांचीही होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी आजारपणासंदर्भात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले होते, त्यांची नाशिक तालुका पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. सदोष प्रमाणपत्रांसंदर्भात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना जाबजवाबासाठी नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. परंतु ते चौकशीसाठी तालुका पोलिसांसमोर हजर न झाल्याने त्या पोलिसांविरोधात आता कठोर पावले उचलले जाण्याची शक्यता आहे. (Bogus Medical Certificate Case police personnel will investigated Nashik Latest Marathi News)

पोलिस कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदल्यांसाठी आजारपणाचे बोगस वैदयकीय प्रमाणपत्र जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे सादर केल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात परजिल्ह्यातील ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना नाशिकमध्ये आंतरजिल्हा बदलीनुसार यायचे होते.

त्यांनी यासाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. ज्याची पोलखोल झाल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी नोटीसा बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, संबंधित पोलीस कर्मचारी उपस्थित राहिलेले नाहीत. सदरील कर्मचारी हे जळगाव, पालघर व बृहन्मुंबई येथील असून, त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला जात आहे.

ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहेत, त्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्यावरही नाशिक ग्रामीण पोलिसांकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच, याप्रकरणात पोलिसांसमोर जबाबासाठी उपस्थित न झालेले जिल्हा रुग्णालयाचे तत्कालिन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात आल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.  

चौकशी समितीला मिळेना रेकॉर्ड

दरम्यान, आरोग्य विभागाच्या आदेशान्वये या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. समितीने रेकॉर्ड विभागाकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचे रेकॉर्डस्‌ मागविले आहे. परंतु, चार दिवस होऊनही सदरील रेकॉर्ड चौकशी समितीला मिळू शकलेले नाही. या विभागाचा लिपिकही गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहे.

समितीने सदरील रेकॉर्ड मिळावे यासाठी नोटीसही बजावलेली आहे. एकूणच, ग्रामीण पोलिसाचा तपास कासवगतीने सुरू आहे तर, दुसरीकडे चौकशी समितीची गाडी रेकॉर्डअभावी रखडल्याचे चित्र आहे.

पगारे यांचीही अटकपूर्वसाठी धाव

याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड विभागाचे लिपिक किशोर पगारे यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावर आज युक्तिवाद होऊन त्यावर गुरुवारी (ता.२२) सुनावणी होणार आहे. पगारे हेही आठवडाभरापासून रजेवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT