Bomb Defuser esakal
नाशिक

Nashik News : सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब...! 2 तासांच्या परिश्रमानंतर निकामी; काय घडलं नक्की?

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील बहुचर्चित सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह विविध पथकांनी लवाटेनगरमध्ये धाव घेतली.

दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने बॉम्ब शोधून काढला आणि तो निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. (Bomb mock drill in City Center Mall Failure after 2 hours of exertion Nashik News)

दहशतवादीविरोधी पथक

शहर पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात गुरुवारी (ता.२०) दुपारी सव्वा बारा-साडे बाराच्या दरम्यान फोन खणाणला आणि सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश मिळाला. नियंत्रण कक्षातून तात्काळ शहर पोलीस यंत्रणेला सतर्कतेेचा इशारा देण्यात आला.

बॉम्बची खबर मिळताच, गंगापूर, मुंबई नाका, सरकारवाडा, अंबड पोलिस ठाण्याच्या पथकांसह शहर गुन्हेशाखा, दहशतवादीविरोधी पथक, बीडीडीएसची पथकांनी सिटी सेंटर मॉलकडे धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलाचे बंब, जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांसह रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या.

सिटी सेंटर मॉल नेहमी गजबजलेला असल्याने अचानक पोलिसांनी मॉलभोवती गराडा घातल्याने मॉलमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या शीघ्रकृतीदल पथकाने मॉलमधील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढल्यानंतर बॉम्बचा शोध सुरू केला.

त्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले. पार्किंगमधील एका वाहनात बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, बॉम्बशोधक व विनाशक पथकाने सदरचा बॉम्ब निकामी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मॉकड्रिल होते...

ऐनवेळी उद्‌भवणारया दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोलिसांसह यंत्रणेची सज्जता तपासण्यासाठी गुुरुवारी सिटी सेंटर मॉल येथे मॉकड्रिल करण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकेच उपायुक्त किरणकुमार चव्हाण,

सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, आनंदा वाघ, सिद्‌धेश्वर धुमाळ, सचिन बारी यांच्यासह गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर,

अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मुंबई नाकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यासह शीघ्रकृती दल, दहशतवाद विरोधी पथक, बीडीडीएस, अग्निशमन दल आणि जिल्हा रुग्णालयाचे पथकाने सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT