NSK26H35014
नंदुरबार : शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. सी. डी. महाजन. शेजारी किरण पाटील, पंकज पाठक, चेतन बच्छाव, शंकर रंगलानी, रवींद्र पोतदार, राधेश्याम मीना, लखनलाल मीणा, एन. डी. दोहरे, डॉ. जयेश तबीयाड, सुनीलकुमार राजोरिया, विनोद लांजेवार, विजय बत्तीशे, वासुदेव सोनार आदी.
---
रेल्वे मजदूर संघातर्फे
‘हाडांचा ठिसूळपणा’ शिबिर
नंदुरबार, ता. १४ : येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिर झाले. डॉ. सी. डी. महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष किरण पाटील, सचिव पंकज पाठक, कोषाध्यक्ष चेतन बच्छाव, शंकर रंगलानी, प्रोजेक्ट चेअरमन व वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे नंदुरबार शाखाध्यक्ष रवींद्र पोतदार, रेल्वेचे सहायक मंडळ अभियंता राधेश्याम मीना, सहायक सिग्नल अभियंता लखनलाल मिणा, सहायक विद्युत अभियंता एन. डी. दोहरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश तबीयाड, वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे सचिव सुनीलकुमार राजोरिया, विनोद लांजेवार, अतुल चौधरी, शरद चौधरी, गौतम बेडसे, दिगंबर देवरे, सचिन रायबोले, समाधान सोनार, राहुल पाटील, रेल्वे पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष विजय बत्तीशे, वासुदेव सोनार, राकेश बत्तीशे, महेश तमाईचेकर आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. महाजन यांनी हाडातील ठिसूळतेबाबत व घ्यावयाची काळजी, याबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात रेल्वे कर्मचारी, नातेवाईक व निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची तपासणी व औषधोपचार धीरज माळी, शुभम दुबे यांनी केली. पकंज पाठक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.