फोटो : NSK26H30940
नंदुरबार : शिक्षण उपसंचालक मोहन देसले यांच्यासमवेत उपस्थित मिनाक्षी भदाणे, प्रशांत बागुल, भिकुभाई त्रिवेदी, डॉ. प्रा. युवराज पाटील आदी.
------------------
‘पुस्तक भिशी’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला चालना
मोहन देसले : देसाई आदर्श मराठी विद्यामंदिरातील सुविधांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ६ : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणारा ‘पुस्तक भिशी’ उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच वाचनसंस्कृतीला चालना मिळत आहे, असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक मोहन देसले यांनी केले. येथील स्वातंत्र्यसैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिरास ‘चला शाळेत जाऊया’ या उपक्रमांतर्गत देसले यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली.
शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश निकुम तसेच केंद्र प्रमुख भुपेश काटे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शाळेतील वर्गखोल्यांची उपलब्धता व स्थिती, स्वच्छतागृहे व स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, किचन शेड व मध्यान्ह भोजन व्यवस्था, विद्युतीकरण, शाळेचे सुरक्षित आवार व प्रवेशद्वार, क्रीडांगण व क्रीडा साहित्य आदी विविध बाबींची यावेळी मोहन देसले यांनी पाहणी केली. या वेळी अशोक सोनार यांच्या इतिहास विषयातील ‘प्रतापगडावरील पराक्रम’ या पाठाचे पाठनिरीक्षण करण्यात आले. अध्यापनातील विषयाची मांडणी, विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रश्नोत्तर पद्धती व अध्ययन- अध्यापन प्रक्रिया यांचे निरीक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांचे अनुलेखन, श्रुतलेखन, गणिती क्रिया आणि वाचन, अभिव्यक्ती तपासण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप, शाळेच्या ग्रंथालयास पुस्तक भेट, पुस्तक भिशी आदी उपक्रमांचे देसले यांनी कौतुक केले. शिक्षकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणारा ‘पुस्तक भिशी’ उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच वाचनसंस्कृतीला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर शिक्षकसभा घेण्यात आली. यावेळी मोहन देसले यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, विद्यार्थीकेंद्री अध्यापन, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध शासकीय शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापिका मिनाक्षी भदाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्राचार्य प्रशांत बागूल, उपमुख्यध्यापक भिकुभाई त्रिवेदी, डॉ. प्रा. युवराज पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.