Booster Dose esakal
नाशिक

Booster Dose Shortage : शहरात बूस्टर डोसचा ठणठणाट! परदेशात जाणाऱ्यांची होतेय अडचण

सकाळ वृत्तसेवा

Booster Dose Shortage : केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना लसीकरणाचे डोस प्राप्त होत नसल्याने परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी कोरोनाचा बूस्टर डोस घेणे अवघड झाले आहे. बूस्टर डोससाठी बुकिंग करा, त्यापूर्वीचे दोन प्रमाणपत्र पाठवा असा द्राविडी प्राणायम करूनही डोस मिळेल की नाही याची शाश्वती नाही.

दुसरीकडे दोन नियमित डोस नंतरचा तिसरा बूस्टर डोस बंधनकारक करण्यात आल्याने परदेशी जाण्यास ब्रेक लागला आहे. (Booster dose shortage in city problem for people going abroad nashik news)

२४ मार्च २०२० ला नाशिक शहरांमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सातत्याने वाढ होत गेली. कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वात भयानक टप्पा ठरला तो दुसरा.

पहिल्या टप्प्यात मृतांची संख्या अधिक असली तरी दुसऱ्या टप्प्यात मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेने शहरातील आरोग्य व्यवस्थेचे लक्तरे बाहेर काढली. त्यानंतर शहरामध्ये चौथी कोरोनाची लाट आली. मात्र त्या लाटेचा प्रभाव दिसला नाही.

मागील दोन महिन्यापासून मुंबई, पुणे व छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली होती. नाशिक महापालिका देखील सज्ज झाली होती.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाचे बेड राखीव ठेवले होते. महापालिकेने तातडीने केंद्र शासनाला पत्र लिहून लस मागणी नोंदविली. परंतु, अद्यापपर्यंत लस प्राप्त झालेली नाही. सुदैवाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लसीकरणाकडे देखील नागरिकांनी पाठ फिरविली व महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने देखील फारशी दखल घेतली नाही. दुसरीकडे परदेशात जाणाऱ्या नागरिकांना बूस्टर डोसचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

मात्र लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने परदेशी जाणाऱ्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते आहे.

लसीकरणाची स्थिती

- पहिला डोस : १४ लाख १३ हजार ५४१ (९३.४६ टक्के)
- दुसरा डोस : ११ लाख ५२ हजार ७६३ (७६.२१ टक्के)
- बूस्टर डोस : एक लाख ६६ हजार ८७४ (११.०३ टक्के)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

Latest Marathi Breaking News : बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळच्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे भावुक; महामार्ग सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

OpenAI Startup : फॅक्टरीत बनणार हवं तसं बाळ! आयुष्यभर कसलाच आजार नसेल; पाण्यासारखा पैसा ओततायत लोक; काय आहे Gene-Edited Baby

Kolhapur Leopard: झुडपातून बाहेर आला बिबट्या! समोरच्या थराराने पशुपालकाचे हृदयच थरारले; म्हैस-बकऱ्या टाकून गावाकडे धूम

SCROLL FOR NEXT