Both founders are present in Maharashtra University of Health Sciences nashik news 
नाशिक

Nashik News: पीजी इन्‍स्‍टिट्यूटमध्ये संगीत खुर्चीचा खेळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयाच्‍या आवारातील पदव्‍युत्तर पदवी महाविद्यालयाच्‍या अधिष्ठातापदासाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरूच आहे. (Both founders are present in Maharashtra University of Health Sciences nashik news)

दोन्‍ही अधिष्ठातांची कार्यालयात हजेरी चर्चेचा विषय ठरत आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होण्याची प्रतीक्षा दोन्‍ही अधिष्ठातांकडून केली जात आहे. आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या पदव्‍युत्तर पदवी महाविद्यालयातील अधिष्ठातापदाच्‍या वादाला काही दिवसांपासून तोंड फुटले आहे.

आधीच या जागेवर डॉ. व्‍यंकट गिते यांची नियुक्‍ती असताना डॉ. सुशीलकुमार झा यांची नियुक्‍ती विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आली. यामुळे हा पेच निर्माण झालेला आहे. दोन्‍हींकडून अधिष्ठातापदावर दावेदारी केली जात असताना, प्रत्‍यक्षात अधिष्ठातांच्‍या दालनात कुणी बसायचे, यावरून रणकंदन पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी (ता. ८) सकाळी डॉ. गिते हे काही वेळेसाठी कार्यालयात उपस्‍थित होते. काही वेळाने ते बाहेर गेले. यादरम्‍यान डॉ. झा कार्यालयात दाखल झाले होते. काही मिनिटांनी तेही विद्यापीठाकडे रवाना झाले.

डॉ. झा यांना त्यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, कुठलेही भाष्य करण्यास त्‍यांनी नकार दिला. योग्‍य ते मार्गदर्शन प्राप्त झाल्‍यावर ते स्‍वीकारार्ह असेल, अशी त्‍यांनी एका वाक्‍यात प्रतिक्रिया दिली. डॉ. गिते म्‍हणाले, की शासनामार्फतच अधिष्ठातापदी नियुक्‍ती झालेली असताना, पुन्‍हा पेच निर्माण होणे अपेक्षितच नाही. शासनाच्‍या निर्णयाच्‍या प्रतीक्षेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT