corona second patient.jpg 
नाशिक

Nashik Corona Update : 'त्या' बाधित महिलेचे दोन्ही मुलं तपासणीसाठी रुग्णालयात 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबड लिंक रोडवरील संजीवनगर भागातील एका वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय विभागातर्फे ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे. बाधित महिलेचे दोन मुलगे प्रत्येकी मुंबई व पुणे येथून आल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांनाही उपचारासाठी दाखल करून घेत त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पुण्या-मुंबईहून आल्याने वैद्यकीय विभागाचा निर्णय 
नाशिक शहरात गोविंदनगर येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर आनंदवली येथील नवश्‍या गणपती परिसरात दुसरा, तर नाशिक रोडच्या तरण तलाव परिसरातील एकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. दोन दिवसांपूर्वी समाजकल्याण विभागाच्या निवारागृहातील एका बावीसवर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. कोरोनाला तोंड देण्याची तयारी सुरू असतानाच गुरुवारी (ता. 16) दुपारी अंबड लिंक रोडवरील एका 67 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 13 एप्रिलला संबंधित महिला जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल झाली होती. त्यापूर्वी गंगापूर येथील एका खासगी रुग्णालयात सर्दी, खोकल्यामुळे उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

वैद्यकीय तपासणी करून ते होम क्वारंटाइन

जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्या महिलेचा स्वॅब तपासण्यासाठी पुणे येथे पाठविण्यात आला. गुरुवारी महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले. महिलेला कोरोनाचा संसर्ग कसा झाला याची माहिती वैद्यकीय विभागाकडून घेतली जात असून, या महिलेला दोन मुलगे आहेत. यातील एक मुंबई, तर दुसरा पुणे येथून आल्याने त्यांनाही कोरोना कक्षात दाखल करून घेण्यात आले. कुटुंबातील अन्य सदस्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT