minor left house
minor left house  esakal
नाशिक

वडिलांच्या रागापोटी घर सोडलेला अल्पवयीन मुलगा पालकांच्या स्वाधीन

अंबादास शिंदे

नाशिक रोड : नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला वडिलांनी अभ्यास करण्यास सांगितले. याचा राग मनात धरून घरून पळून आलेल्या मुलाला लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले. त्याला त्याच्या काकाच्या स्वाधीन करण्यात आले. नाशिक रोड लोहमार्ग ठाण्यातील हवालदार संतोष उफाडे- पाटील व पोलिस नाईक विजय कपिले हे गुरुवारी (ता. ३१) दुपारी गस्त घालीत असताना एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. त्याची विचारपूस केली असता, त्याने नाव प्रेम भगत (१४) असल्याचे सांगितले. मात्र, त्याव्यतिरिक्त कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिला.

उफाडे पाटील यांनी प्रभारी पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना याबाबत कळवले. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बेपत्ता मुलाच्या शोधासाठी आयसीजेएस (ICJS) ही यंत्रणा कार्यरत केली आहे. त्या माध्यमातून मुलाचा शोध घेण्याचे सांगितले. त्यानुसार शोध घेतला असता कल्याण बदलापूर पूर्व भागातील प्रेम हा रहिवासी असून तेथील पोलिस ठाण्यात यांचे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. तेथील पोलिसांच्या मदतीने प्रेमच्या आई- वडिलांचा शोध घेतला असता, त्यांनी प्रेमचे काका नाशिकमध्ये राहत असल्याचे सांगून प्रेमचा ताबा देण्याचे सांगितले. त्यानुसार प्रभारी निरीक्षक कुलकर्णी, उफाडे पाटील व कपिले यांनी त्याचे काका लखन भगर यांच्या ताब्यात दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT