brahmagiri circumnavigation 
नाशिक

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा यंदादेखील भाविकांना बंद

कमलाकर अकोलकर

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) : मागील दिड वर्षांपेक्षा जास्त काळापासून देशात कोरोनाचे थैमान सुरु आहे, आगामी काळात कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्याता वर्तवण्यात येत असल्याने देशातील अनेक धार्मिक सोहळे घरातच साजरे करावे लागले आहेत. गेल्या वर्षीपासून कोविडमुळे येथे श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी पर्वतास घालण्यात येणारी प्रदक्षिणा बंद करण्यात आली आहे. या प्रदक्षिणेत २० किलोमीटर व ४० किलोमीटर अशा दोन प्रकारे प्रदक्षिणा घातल्या जातात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान हा पर्वत आहे. या प्रदक्षिणेसाठी प्रतिवर्षी लाखो भाविक या हजेरी लावतात.

गेल्या वर्षी ही प्रदक्षिणा कोविडमुळे रद्द करण्यात आली होती. या वर्षीदेखील कोविडमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून रद्द करण्यात आली असल्याचे शुक्रवारी (ता. ३०) महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत तहसील कचेरीत प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, सहाय्यक पंचायत समिती अधिकारी पाठक, महसूल मंडल अधिकारी, तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. ८ ऑगस्टपासून श्रावण महिन्यास सुरवात होत आहे. प्रदक्षिणेस काही भक्त महिनाभर पायी जाण्याचा नियम करतात, तर काही श्रावण सोमवारी, तर काही फक्त तिसऱ्या श्रावण सोमवारी हजेरी लावतात. प्रदक्षिणेस बंदी असल्यामुळे लाखो भाविक मुकणार आहेत. (brahmagiri circumnavigation is again this year closed to devotees)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

Mughal History: सर्वात शक्तिशाली मुघल बादशहा होता समलैंगिक! तरण्याबांड पोराच्या प्रेमाखातर बायकोलाही सोडून दिलेलं

SCROLL FOR NEXT